गुरू पौर्णिमा निमित्त वाङ् मय मंडळाचे उद्‌घाटन सह वकृत्व स्पर्धा संपन्न.

गुरू पौर्णिमा निमित्त वाङ् मय मंडळाचे उद्‌घाटन सह वकृत्व स्पर्धा संपन्न. डी एस देशमुख विद्यालयात विद्यार्थ्यांनी वर्णन केला गुरु महिमा. गुरू महिमा हा निबंध मनात व शालेय वहित लिहा: नंदकुमार चौधरी यांचे मत.

भुसावळ प्रतिनिधी- युवराज कुरकुरे ! मानवी जीवनात गुरूचे महत्व अनन्य साधारण आहे . गुरू पौर्णिमा निमित्त विद्यालयात विद्यार्थ्यांच्या अंगी मराठी भाषीक जीवन कौशल्य निर्माण करणे, श्रद्धा, भक्ती, कला, भारतीय संस्कृती, वाङ्मयीन मूल्ये विकसित करण्याच्या हेतुने प्रेरीत होवुन वाङ् मय मंडळाची स्थापना शैक्षणिक वर्ष 2024- 25 साठी विद्यालयात मुख्याध्यापक सत्यनारायण वैष्णव यांचे मार्गदर्शनात करण्यात आली . कार्यक्रमाचे प्रास्तविक मंडळाचे युवराज कुरकुरे यांनी केले . मंडळाचे उद्‌घाटन गुरुपौर्णिमा निमित्त गुरू प्रतिमा ( अमृत्स्य पुत्र ) पुजन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा दी एज्यूकेशन सोसायटी थोरगव्हाण तालुका रावेर संचालक नंदकुमार एकनाथ चौधरी यांचे शुभ हस्ते करण्यात आले . पर्यावरण पूरक पुष्पगुच्छ देवून मान्यवरांचे स्वागत् केले .


विद्यार्थ्यांसाठी वाङ् मय मंडळा तर्फ वकृत्व स्पर्धा संपन्न झाली . एकुण 11 विद्यार्थ्यांची भाषणे सादर झाली . गुरुशिष्य महिमा वर्णन केला . कु हर्षाली किशोर कोळी इयत्ता 9 अ प्रथम क्रमांक, कु . एकता योगेश कुंभार इयत्ता 7 ब द्वितीय क्रमांक, कु जागृती धनराज पाटील इयत्ता 8 ब तृतिय कृमांक, कु. ममता बाळू पाटील इयत्ता 10 ब उत्स्फूर्त मनोगता साठी प्रोत्साहन क्रमांक प्राप्त झाला. विजयी वकृत्व स्पर्धा विजेतांना रोख बक्षिस कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकुमार चौधरी यांनी देवून कौतुक केले . पर्यवेक्षक डी के पाटील यांनी मनोगत व्यक्त केले . आई – वडिलांचे चरण स्पर्श करा , गुरुजनांचे म्हणणे ऐका असे सांगितले . अध्यक्षीय मनोगतातुन विद्यार्थ्यांनी गुरू महिमा हा निबंध मनात व शालेय वहित स्वतः लिहा. असा संदेश दिला . सदर कार्यक्रम वाङ् मय मंडळा तर्फे संपन्न झाला . विद्यार्थीनींनी शिक्षकांना ग्रिटींग कार्ड , पेन भेट वस्तु देवुन , मनोगतातून शुभेच्छा दिल्या . फलक लेखन कला शिक्षक एस बी सपकाळे यांनी केले . कार्यक्रमाचे नियोजन वङ्‌मय मंडळाचे प्रा. योगेश कोष्टी यांनी केले . टी पी घुले, जे ए चौधरी यांचे सहकार्य मिळाले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वाय जे कुरकुरे यांनी तर आभार प्रा . शितल तायडे यांनी मानले . सर्व शिक्षिक बंधु भगिनी शिक्षकेतर कर्मचारी बांधव विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *