युवा नेतृत्व धनंजय चौधरी यांच्या संकल्पनेतून कृतज्ञता संवाद यात्रेची सुरुवात
दक्ष जळगाव प्रतिनिधी जुम्मा तडवी रावेर सातपुडयाच्या पायथ्याशी असलेल्या गौरखेडा गावापासून झाली. ही यात्रा गौरखेडा,लोहारा,चिंचाटी,जानोरी अशी भेट देत पुढे प्रस्थान करत आहे. सातपुडा परिसरातील आदिवासी व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला भाग स्वर्गीय धनाजी नाना चौधरी यांनी गौरखेडा या गावापासून रचनात्मक कार्याला सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी गौरखेडा पंचक्रोशी मंडळ स्थापन केले व त्या मार्फत सूतकताई शिकवले त्याचप्रमाणे इथे स्थानिक रहिवाशी यांच्या राहण्याची व्यवस्था करून वसाहत निर्माण केली तिथल्या समस्या समजून घेत संपूर्ण सातपुडा पायथ्याचा विकास करण्याचे ठरवले व त्यातूनच सातपुडा विकास मंडळाची स्थापना झाली. बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनी 1988 या वर्षी गौरखेडा येथे आश्रम शाळा सुरू केली. गावकऱ्यांनी त्यासाठी तीन एकर जमीन दान केली त्यामुळे तिथल्या लोकांची शिक्षणाची सोय झाली त्यातून शिक्षक निर्माण झाले हळूहळू गावाचा विकास झाला. दादासाहेबांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली अशा या जुन्या परंपरेला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी युवा नेते धनंजयभाऊ यांच्या यात्रेदरम्यान गावाच्या विहिरीचे जलपूजन सुमित्रा विनोद भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करताना युवा नेते धनंजयभाऊ चौधरी यांनी गावकऱ्यांना पाण्याचे महत्व समजून सांगून जुन्या वाडवडिलांचा वारसा जोपासण्यासाठी त्यांच्यामध्ये जागृती निर्माण केली. आदिवासी मुलांना शिक्षण पोहोचले तरी पण त्या गावातील ज्या समस्या होत्या त्या गावकऱ्यांनी मांडल्या. शाळेसाठी कॉम्प्युटर प्रिंटर, वाचनालय पाण्याची टाकी इत्यादी मागण्या गावकऱ्यांनी धनंजय भाऊ यांच्याकडे मांडल्या. त्याचप्रमाणे महिला बचत गटाच्या समस्या व गावासाठी दोन किलोमीटरचा रस्ता मंजूर झालेला आहे व पुढील सुधारणा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी मांसोर मिरखा तडवी,गंभीर तडवी,महिला बचत गट- सरपंच सुलताना यासीन तडवी,,यासीन मन्सूर तडवी,युसुफ रमजान तडवी(अध्यक्ष वन समिती),उस्मान सुपडू तडवी,रज्जाक रमजान तडवी,सलीम रमजान तडवी,गंभीर हैदर तडवी तसेच धनंजय भाऊ यांनी स्वयम् रोजगार निर्माण करण्यातसाठी नव नवीन योजनांचा कल्पना सुचवल्या तसेच गावतील अडचणी सोडवण्यासाठी मार्गदर्शन केले.जांनोरी या गावी विहिर पूजन सरपंच सुलताना यासीन तडवी आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. चिंचाटी गावात पंप पूजन रशीद शिसारू तडवी, छोटू सिकंदर तडवी सरपंच यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी गावातील स्वर्गीय व लोकांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण रेहमान तडवी,युसुफ तडवी, मन्सूर मिर्खा तडवी,गंभीर हैदर तडवी,हाबिब छबू तडवी,मुबारक भिकारी तडवी.असलंम तडवी ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते. वृक्षारोपण हबीब बाबू तडवी, सिकंदर तडवी,रशीद तडवी,मयूर नारखेडे,रेहमान तडवी,ह्यांच्या हस्ते वृक्षरोपन करण्यात आले.. उदया पुढील गावात पोहचणार कृतज्ञता संवाद यात्रा – सहस्त्रलिंग ,लालमाती ,कुसुंबे बुद्रुक, कुसुंबे खु