गिरणा नदी पात्रातून वाळू चोरी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी शेतकरी संतप्त : आमरण उपोषणाचा इशारा
भडगाव तालुका प्रतिनिधी : भावेश पाटील
भडगाव : शहरातील जुना पिंपळगाव रस्त्यावरून घोडदेबाबा देवस्थाना जवळुन गिरणा नदीच्या पात्रातून दररोज रात्री ५० ते ६० ट्रॅक्टरद्वारे वाळूची चोरटी वाहतूक होते. या वाळूच्या ट्रॅक्टरमुळे जुना पिंपळगाव रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदार विजय बनसोडे यांना निवेदन दिले.
या निवेदनात नमूद केले आहे की, घोडदेबाबा देवस्थाना जवळ गिरणा नदीच्या पात्रातून दररोज रात्री सुमारे ५० ते ६० ट्रॅक्टरद्वारे वाळूची चोरटी वाहतूक होते.
या ट्रॅक्टरच्या वापरांमुळे जुना पिंपळगाव रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तसेच नवनाथ बाबा मंदिरावर आणि घोडदे बाबा देवस्थानावर ही भाविकांसह शेतकरी याच रस्त्याने वापर करत असतात.
हा रस्ता वाळू माफियांनी पूर्ण खराब केला आहे. त्यात शेतकऱ्यांना रस्त्याने पायी चालणेही कठीण झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी वाळू चोरट्यांना बराच वेळा हकलण्याचा प्रयत्न केला परंतु वाळू चोरांनी दादागिरी केल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली. ही वाळू चोरी थांबावी आणि वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. सात दिवसात कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही तर दि. १२ ऑगस्ट पासून भडगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी संजय परदेशी, सुनील पाटील, मुनगाहीद खॉ. पठाण, इंदल परदेशी, फिरोजखान मजिद खान तौसीफ खान, मुश्ताक अहमद, शेख परवेज शेख अहमद, अवधूत महाजन, हिरामण पाटील, प्रकाश सूर्यवंशी, कैलास परदेशी, सौरभ देशमुख, अविनाश अहिरे, शेख अल्ताफ शेख उमर, इखान खान युसूफ खान, अभय हरी परदेशी, अशोक आनंदा सूर्यवंशी, समीर खान जहाँगीर खान, विजय एकनाथ शिनकर, सुरेश तोताराम पाटील, नितीन कदम,भगवान महाजन्, किशोर महाजन, गोरख दगा पाटील, संतोषा लक्ष्मण पाटील, आसिफ शेख, शेखा अहमद शेख अमीर उपस्थित होते.