पांझरा नदीवर मुडी व मांडळ बंधाऱ्यांसह पाटचारी पुनर्जीवन प्रकल्पाचे थाटात उद्घाटन.

पांझरा नदीवर मुडी व मांडळ बंधाऱ्यांसह पाटचारी पुनर्जीवन प्रकल्पाचे थाटात उद्घाटन मंत्री अनिल पाटलांच्या प्रयत्नांनी २० ते २२ गावांना होणार सिंचनाचा फायदाअमळनेर- तालुक्यातील पांझरा नदीवर मुडी व मांडळ बंधाऱ्यांसह लवकी व भाला नाला पाटचारी पुनर्जीवन प्रकल्पाचे थाटात उद्घाटन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्यव हस्ते व खासदार स्मिता वाघ यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी शेती सिंचनाच्या दृष्टीने हे मोठे काम मार्गी लागल्याने २० ते २२ गावांना सिंचनाचा मोठा फायदा होणार आहे. दरम्यान सदर कामांतर्गत पांझरा नदीवरील सुकवद गावापासुन मांडळ गावापर्यंत बंधारा व कालव्याव्दारे पाणी भाल्या नाल्यात टाकणे (मांडळ- मुड़ी फंडबंधारा) दुरुस्ती व पुनर्भरण करणे, रक्कम 1 कोटी 29 लाख रुपये आणि पांझरा नदीवरील हेकळवाडी गावापासुन मांडळ गावातुन व्हाया मुडी गावापर्यंत बंधारा व कालव्याव्दारे पाणी लवकी नाल्यात टाकणे ( मुडी फंडबंधारा) दुरुस्ती व पुनर्भरण करणे,रक्कम 3 कोटी 79 लाख या दोन्ही कामाचे उद्घाटन मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले.दरम्यान पांझरा नदीवरुन कालव्याव्दारे भाला नाला व लवखी नाल्यावरील पांझरा पाठचाऱ्या पुनर्जीवन करून मांडळ-मुडी परिसरातील २० ते २२ गावांचा पिण्याचा पाण्याचा व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सोडविल्यामुळे शेतकरी राजा आनंदीत झाला आहे. यावेळी एच.एल.पाटील यांनी या पाठचाऱ्या मुळे शेतकऱ्यांना किती फायदा होईल त्याची माहिती दिली. प्रणव पाटील यांनी मुडी गावासाठी आज पर्यंत नामदार अनिल पाटील यांनी सुमारे 14 ते 15 कोटी निधीच्या माध्यमांतून विविध विकामकाम दिल्याबद्दल अभिनंदन व आभार व्यक्त केले.तालुक्याचा पुत्र आमदार खासदार राहिल्यास हाच फायदामंत्री अनिल पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले की पाण्याचे किती महत्व आहे ते शेतकरी राजालाच माहिती, आज आपल्या तालुक्यात पाडळसरे धरण तसेच पांझरा व बोरी नदीवर बंधारे, केटीवेअर तसेच फाफोरे पाटचारी दुरुस्ती यासह विविध विकासकामे झाली आहेत. आपल्या तालुक्याचा पुत्र किंवा व्यक्ती आमदार, मंत्री, खासदार राहिल्यास काय फायदे होऊ शकतात हे आज दिसून आले असून हीच परंपरा आपण कायम ठेवल्यास शेतकरी राजा सुखी व समृद्ध झाल्या शिवाय राहणार नाही असे त्यांनी सांगितले.यावेळी खासदार स्मिता वाघ यांनी भावनिक होत मुडी, मांडळ सह परिसरातील ग्रामस्थ मंडळ, महायुती पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधीं यांनी लोकसभा निवडणूकीत खंबीर साथ दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी मा.जि.प.सदस्या सौ.जयश्री पाटील, संगिताबाई भिल, मा. पंचायत समिती सभापती चंद्रसेन पाटील, तालुका रा.का.अध्यक्ष भागवत पाटील, मुडी सरपंच श्रीमती मंदाबाई भाऊराव पाटील, अमळनेर बाजार समिती सभापती अशोक आधार पाटील, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष प्रा. सुरेश पाटील, अनिल शिसोदे, बाजार समिती संचालक अशोक हिम्मत पाटील, समाधान धनगर, डॉ. रामराव पाटील, मुडी मा. सरपंच संजय पाटील, विजय जैन, संजय पाटील, उदय पाटील, बापु बडगुजर, उदय पाटील, हेमंत पाटील गजु महाराज, एच.एल.पाटील, नारायण पाटील, पंढरीनाथ पाटील, पंकज पाटील, राजेंद्र पाटील, पिंटू पाटील, गणेश भोई, शांताराम नाना, बोदर्डे येथिल विकास पाटील, प्रफुल्ल पाटील, पंढरीनाथ पाटील, महेद्र पाटील, किशोर पाटील, शांताराम पाटील, गोकुळ पाटील, मधुकर पाटील व पांझरा परिसरातील ग्रामस्थ मंडळ, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकासो चेअरमन, व्हा.चेअरमन संचालक व महायुती पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गौरव उदय पाटील, गुणवंत पाटील, विजय जैन, प्रणव पाटील, नाना पाटील, पाटील यासह ग्रामस्थानी परिश्रम घेतले, मा.आर.एफ.ओ. पी.पी.सुर्यवंशी, ग्रा.प.सदस्य विक्की सुर्यवंशी, व प्रा.ज्ञानेश्वर सुर्यवंशी सर यांनी मनोगत व्यक्त केले, सुत्रसंचलन गुणवंत भैय्या पाटील यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *