महसूल जनसंवाद तसेच लोकाभिमुख विविध विषयावर शेतकरी व युवकांना मार्गदर्शन .

महसूल जनसंवाद तसेच लोकाभिमुख विविध विषयावर शेतकरी व युवकांना मार्गदर्शन .
विविध योजनांचे अनुदान व विद्यार्थ्यांचे दाखले वेळेवर देणार:- तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी

धरणगाव तालुका प्रतिनिधी :- राजु बाविस्करधरणगाव – साळवे महसूल मंडळातील शेतकऱ्यांना व युवकांना महसूल पंधरवाडा निमित्त जनसंवाद यात्रेत विविध विषयांवर तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी साहेब यांनी साळवे इंग्रजी विद्यालयाच्या सभागृहात मार्गदर्शन केले. महसूल पंधरवाड्या निमित्त शेतकऱ्यांना अधिकाधिक सोयीसुविधा देण्यात येऊन नागरिकांची कामे सुलभ होण्यासाठी उपाययोजना करण्याचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्यासह तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील राहतील असे सांगितले. शेतकऱ्यांना व युवकांना मोलाचे मार्गदर्शन करताना विविध योजनांविषयी सखोल माहिती देऊन कामे वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी शेतकऱ्यांना ई पीक पाहणी, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, शेतकरी आत्महत्या अनुदान, भोगवटा वर्ग-२, पी एम किसान व नैसर्गिक आपत्ती, ई के वाय सी, संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजना यांच्यातील त्रुटी, लाडकी बहीण योजना अनुदान नोंदणी व विद्यार्थ्यांना विविध दाखले,अशा विविध योजनांची परिपूर्ण माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांच्या शेत रस्त्याच्या समस्यांबाबत आपापसात वाद करून प्रश्न सुटत नाहीत ते सामंजस्याने सोडवावेत व ई पीक पाहणी १५ ऑगस्ट पर्यंत त्वरित करावी असे सांगितले. तहसीलदार साहेबांनी केलेल्या मार्गदर्शनाने पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले तसेच असे अधिकारी व कर्मचारी असतील तर गावाचा व परिसराचा विकास होण्यास वेळ लागणार नाही, अशी भावना शेतकऱ्यांनी व युवकांनी व्यक्त केली. या प्रसंगी साकरेचा शेतकरी सुपुत्र स्वप्नील पाटील यांचा पहिल्या प्रयत्नात पी एस आय झाल्याबद्दल सत्कार केला. यावेळी नायब तहसीलदार संदीप मोरे, ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष डॉ गिरीश नारखेडे, खजिनदार डॉ चंद्रकांत नारखेडे, मुख्याध्यापक एस डी मोरे,साळवे सरपंच आशा कोल्हे, मंडळाधिकारी प्रवीण बेंडाळे,साळवे मंडळातील सर्व तलाठीआप्पा, वि का सोसायटीचे सदस्य मोहन सोनवणे, उपसरपंच बलमाबी पटेल, सदस्य मनोज अत्तरदे,संजय कोल्हे,सचिन सोनवणे व पंचक्रोशीतील शेतकरी बंधू भगिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *