जळगाव जिल्ह्यातील अवैध धंदे त्वरित बंद व्हावेत. तसेच वाळूचे ठेके त्वरित चालू व्हावे. मनसे

जळगाव शहरांमधील महत्त्वाच्या तीन ठिकाणी उड्डाणपूल होण्याकरिता. 2) महामार्गावर समांतर रस्त्याचे काम होणे. 3) शहरातील रस्त्यांचं काम होणे. 4) जळगाव जिल्ह्यातील अवैध धंदे त्वरित बंद व्हावेत. 5) 16 ते 24 वयोगटातील युवक युवतींचा आत्महत्या रोखण्यासाठीचे प्रबोधन समिती गठीत व्हावी. 6) वाळूचे ठेके त्वरित चालू व्हावे.

अर्जदार आशिष उत्तमराव सपकाळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना उप महानगर अध्यक्ष जळगाव

महाराष्ट्र नवनिर्माण सेना व जळगाव शहरातील तमाम नागरिक यांच्यातर्फे विशेष निवेदन विनंती करतो जळगाव शहरातील रस्ते हे खूप खड्डेमय झालेले असून अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यात महत्त्वाचे ठिकाण म्हणजे शिव कॉलनी स्टॉप, आकाशवाणी चौक, इच्छा देवी चौक, अजिंठा चौफुली. कालंकी माता या ठिकाणी आतापर्यंत रस्त्यातील खड्डे आणि ट्राफिक मुळे 2023-24 मध्ये 480 लोकांचा अपघाती मृत्यू झाला आहे त्यात 670 लोकांनी हात पाय गमावलेले आहे आणि 350 लोक किरकोळ जखमी झालेले आहेत, अशा या नरभक्ष महामार्ग वर त्वरित उड्डाणपूल व्हावे हे अति महत्त्वाचे आणि गरजेचे आहे. जेणेकरून निष्पाप जनतेचे प्राण वाचतील गेल्या काही महिन्यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या तिघ जागेंसाठी पाई जागर यात्रा काढली होती, त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेने सोबत जळगाव शहरातील शेकडो नागरिक आमच्या आंदोलनात सामील झाले होते, आणि नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया यांच्या अधिकाऱ्याला सुद्धा आम्ही गेल्या दोन वर्षापासून निवेदन देत आहोत तरी हे झोपलेले प्रशासन अजून तगायात जागे झालेले नाहीत, आणि त्यामुळे शेकडो लोकांचा प्राण जात आहे तरी आपण या विषयावर गांभीर्याने विचार करून जळगाव शहरा मधून या तिन्ही ठिकाणा वर उड्डाणपूल तयार करण्यासाठी अध्यादेश काढावे. अशा या नरभक्षक महामार्गावर उड्डाणपूला शिवाय पर्याय नाही. त्यातच पाळधी ते तरसोद पर्यंत बायपास होत आहे त्याचं काम संत गतीने चालू आहे. आपणास कळकळीची मनसे विनंती आहे की आपण या विषयावर गंभीर्याने विचार करावा आणि उड्डाण उड्डाणपूल व्हावे यासाठी आदेश देण्यात यावे ही आपणास विनंती. तसेच महामार्गावर समांतर रस्ता नसल्याने सुद्धा मोटरसायकली घसरून त्या ठिकाणी छोटे-मोठे अपघात होत असतात गेल्या एक वर्षापासून कोठे नगर ते इच्छा देवी पर्यंतचा समांतर रस्ता मंजूर असून सुद्धा आजपर्यंत कामाला सुरुवात झालेली नाही,

या कामाची चौकशी होऊन त्वरित काम सुरू व्हावे. जळगाव शहरामध्ये फक्त रस्त्यासाठी 400 कोटी रुपयांच्या वरती निधी आला असून खर्चित झालेला आहे परंतु अजून वीस ते पंचवीस टक्के जळगाव शहरातील रस्ते झालेले नाहीत आणि त्यात महानगरपालिकेचा आणि बांधकाम विभागाचा रस्त्यासाठीचा निवरा आणि पाणी फ्लो होण्यासाठीच नियोजन टाऊन प्लॅनिंग अशा कोणत्याच पद्धतीची उपाययोजना रस्त्यासोबत होत नाही आहे. काही ठिकाणी रस्ता होतोय पण त्याला गटारीचं नालीचं केली जात नाही त्यासाठी येणाऱ्या काळात जळगाव शहरामध्ये पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याचा प्रमाण वाढणार आहे त्यासाठीही कृपया आपण उपायोजनासाठीचे आदेश द्यावेत तसेच जळगाव शहरात व जळगाव जिल्ह्यात अवैध धंदे जसे सट्टा बाजार, अवैध दारूचे विक्री, गावठी कट्टे हे जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि याचा दुष्परिणाम येणाऱ्या नवीन पिढीला भोगावा लागेल. म्हणून त्या आधीच आपण उपाययोजना करावी तसेच जळगाव शहरा मध्ये व जिल्ह्यात वाळूचे ठेके रद्द झालेले आहेत तरीसुद्धा अवैधरिता रित्या जिल्ह्यातील नद्यांमधून वाळू उत्खनन चे काम चोरीचे काम अति प्रमाणात चालू आहे मी आपणास निदर्शनास आणून देतो की जळगाव जिल्ह्यात जर वाळूचे ठेके बंद आहेत तरी शहरात आणि जिल्ह्यात बांधकाम कसे होतात सरकारी कामांच्या वर्क ऑर्डर कार्यभार आदेश कसे होत आहेत, याची आपण दखल घ्यावी आणि ही वाळू एका सामान्य व्यक्तीला आपलं घर बांधण्यासाठी दोन हजार रुपयाची वाळू सहा हजार रुपये मध्ये घ्यावी लागत आहे आणि वाळूपोटी जळगाव जिल्ह्यामधून प्रशासनाला 200 ते 250 कोटी रुपयाचं निधी जमा होत असतो, आणि इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे येत असताना सुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे आणि ठेका चालू करत नाही आहे, यात एका सामान्य माणसांचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, तरी आपण माननीय जिल्हाधिकारी महोदयांना कृपया आदेश देऊन वाळूचा ठेका चालू करण्यात यावा ही विनंती. तसेच एक अत्यंत महत्त्वाची विषय म्हणजे जळगाव जिल्ह्याचा आत्महत्या मध्ये महाराष्ट्रात क्रमांक दोन वर येतो ही बाब अत्यंत दुखद आहे वयाच्या 16 ते 25 वयोगटातील युवक युवती हे कोणत्या ना कोणत्या कारणाने आत्महत्या करीत आहेत आणि त्यात जळगाव जिल्ह्याचा नाव अव्वल क्रमांक असणे हे जिल्ह्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे, मी आपणास विनंती करतो की जळगाव जिल्ह्यामधून प्रबोधन समिती आपण गठीत करावी त्यात निवृत्त आयएस अधिकारी निवृत्त मुख्याध्यापक डॉक्टर्स इंजिनियर्स आणि समाजसेवक यांची एक समिती गठन करून जिल्ह्यामध्ये दर हप्त्याला शाळेत महाविद्यालयात जाऊन त्या विद्यार्थ्यांना प्रबोधन करणे आणि त्यांच्या मनातला द्वेष आणि टेन्शन दूर करणे. असे या समितीने काम करावे अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची इच्छा असून जेणेकरून आत्महत्याच प्रमाण कमी होईल, म्हणून मी आपणास पुन्हा विनंती करतो की आपण एक निर्भड व्यक्ती महत्त्वाचे, मवाळ स्वभावाचे आणि निष्पक्षता महत्वकांक्षी व्यक्ती आहात हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, त्यासाठी आपण या जळगाव जिल्ह्यातील या आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि आपण ते करालच अशी आम्हाला अपेक्षा आहे.

निवेदन देतेवेळी मनसे उपमहानागराध्यक्ष आशिष सपकाळे, जिल्हाध्यक्ष ऍड जमील देशपांडे, जिल्हा संघटक राजेंद्र निकम, महानगराध्यक्ष किरण तळले, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, हरिओम सूर्यवंशी खुशाल ठाकूर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *