नगर परिषद प्राथमिक शाळा क्र.३ शिरपूर येथे स्वातंत्र्य दिनाचा सोहळा संपन्न.

नगर परिषद प्राथमिक शाळा क्र.३ शिरपूर येथे स्वातंत्र्य दिनाचा सोहळा संपन्न.आज दि १५ ऑगस्ट 2024 रोजी नगर परिषद प्राथमिक शाळा क्र.३ शिरपूर येथे 78 वा स्वातंत्र्य दिन सोहळा उस्फूर्तपणे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे सन्माननीय विकास शिरसाठ , नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ७ चे माजी मुख्याध्यापक सन्माननीय . श्रीराम सोनवणे सर, पीबीएम हायस्कूलचे माजी शिक्षक आदरणीय एस. एम. बडगुजर सर तसेच शिक्षक पालक संघाचे सदस्य गणेशभाऊ बाशिंगे आणि माता पालक संघाचे लीडर माता सौ. जयश्रीताई या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. सर्वप्रथम सर्व उपस्थित प्रतिष्ठित मान्यवर यांचं शब्दसुमनाने स्वागत करण्यात आले. व त्यानंतर मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी ध्वज स्तंभाचे पूजन केले. व त्यानंतर पीबीएम हायस्कूलचे माजी शिक्षक एम, एस. बडगुजर सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय राजेसिंग पावरा सर यांनी केले.त्यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. व त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आला. याचबरोबर पी बी एम हायस्कूलचे माजी शिक्षक एम. एस. बडगुजर यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता विकासासाठी शाळेला १००१ रुपये दान दिले . त्यानंतर नगर परिषद शाळा क्र.७ माजी मुख्याध्यापक सोनवणे सर यांनी विद्यार्थ्यांना भारतीय स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विशद केले. त्यानंतर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक पाहुण्यांचे आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन इंगोले सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक पावरा सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकेतर कर्मचारी कुसुमबाई खरे व इंगोले सर यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *