आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिवस उत्साहात.

आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिवस उत्साहात.

धरणगाव तालुका प्रतिनिधी – राजु बाविस्कर, 15 ऑगस्ट 2024 रोजी आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालय पिंप्री येथे स्वतंत्रता दिवस उत्साहित संपन्न झाला या प्रसंगी ध्वजारोहण अरुण त्र्यंबक देसले (सेवा निवृत्त रेल्वे सुरक्षा बल ) यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी मंचावर माजी सैनिक दिनकर पाटील , केंद्र प्रमुख प्रमोद पाटील , अजयसिंग पाटील , डॉ सुनील पाटील तसेच वेदमाता गायत्री बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मधुकर रामजी चौधरी , उपाध्यक्ष प्रमोद चौधरी , सचिव विनोद चौधरी , संपुर्ण संचालक मंडळ उपस्थित होते .

विद्यार्थ्यांनी विविध महापुरुषांच्या वेशभूषा माध्यमातून उपस्थितांचे लक्ष वेधले . सर्वप्रथम पिंप्री गावातुन शिस्तबद्ध रॅली निघत विद्यार्थ्यांनी देशप्रेम व्यक्त करत जोरदार घोषणांनी परिसर प्रफुल्लित केला. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध कसरती , मानवी मनोरे , गितगायन , देशभक्ती नृत्य , लेझीम , आदी मनमोहक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्य दिवसाचे औचित्य साधत शाळेत डिजिटल लॅब व विज्ञान प्रयोगशाळा उदघाटन केंद्र प्रमुख प्रमोद पाटील यांच्या हस्ते पार पडले . तसेच तालुका स्तरीय चित्रकला स्पर्धा , एम टी एस परीक्षा , व इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सॊ वैशाली चौधरी , तसेच आर आर पावरा , विशाल सपकाळे यांच्यासह शिक्षक शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी , पालकवर्ग , विविध क्षेत्रातील मान्यवर , उपस्थित होते . सूत्रसंचालन सतिष शिंदे तर आभार राजेंद्र पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *