विवेकानंद प्रतिष्ठान संचालित प्राथमिक शाळा वाघ नगर येथे ‘विश्व संस्कृत दिन’ तसेच रक्षाबंधन उत्सव उत्साहात संपन्न.

विवेकानंद प्रतिष्ठान संचालित प्राथमिक शाळा वाघ नगर येथे ‘विश्व संस्कृत दिन’ तसेच रक्षाबंधन उत्सव उत्साहात संपन्न.दिनांक 17 ऑगस्ट शनिवार रोजी विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक विद्यालयात रक्षाबंधन आणि विश्व संस्कृत दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये संस्कृत दिनानिमित्त इयत्ता पाचवी ते सातवी साठी ‘संस्कृत गीत गायन – वैयक्तिक आणि समूह’त्याचबरोबर इयत्ता आठवी ते दहावी साठी संस्कृत कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्ततेने सहभाग नोंदवला. वैयक्तिक गीत गायनात प्रथम क्रमांक प्रांजल पवार ,द्वितीय क्रमांक सुहानी पाटील,तृतीय क्रमांक वैष्णवी पवार ने पटकावला. समूहगीत गायनात प्रथम क्रमांक स्वरा वारूळकर ग्रुप, द्वितीय क्रमांक सिद्धी कुलकर्णी ग्रुप, तृतीय क्रमांक ऋतुजा पाटील ग्रुप यांनी पटकावला तसेच कथाकथन मध्ये प्रथम क्रमांक हिमानी सोनार व द्वितीय क्रमांक जानवी घाटोळ ने पटकावला. संपूर्ण स्पर्धांचे परीक्षण प्राथमिक विभागाच्या समन्वयिका  जयश्री वंडोळे यांनी केले.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विवेकानंद प्रतिष्ठान संस्थेच्या अध्यक्षा शोभा पाटील लाभल्या होत्या. त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक  हेमराज पाटील व समन्वयीका वैशाली पाटील देखील उपस्थित होत्या. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी केले. त्यामध्ये गणेश वंदना, मधुराष्टक, पांडुरंग अष्टक आणि शिवतांडव स्तोत्र यांचे सादरीकरण देखील करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आणि नियोजन  मीना मोहकर यांनी केले.त्याचबरोबर विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाची माहिती आणि महत्त्व सांगून विद्यार्थ्यांकडून बनवून घेतलेल्या नैसर्गिक राख्यांनी रक्षाबंधनाचा उत्सव साजरा करण्यात आला. ज्यामधे विद्यार्थिनींनी आपल्या वर्ग बंधूंना राखी बांधली. निसर्ग संवर्धनाच्या छंद वर्गातील छंद प्रमुख सुजाता पाटील यांनी आपल्या विद्यार्थ्यांसोबत परिसरातील झाडांना राख्या बांधून निसर्ग संवर्धनाचे महत्त्व पटवून सांगितले. संपूर्ण कार्यक्रमाला मुख्याध्यापक  हेमराज पाटील व समन्वयिका वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन लाभले, त्याचबरोबर सर्व शिक्षक बंधू भगिनींचे देखील सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *