दहशत निर्माण करणाऱ्या गावठी कटट्यासह अटक.

दहशत निर्माण करणाऱ्या गावठी कटट्यासह अटक


जळगाव: एरंडोल शहरातील २० वर्षीय तरुण गावठी पिस्टल बाळगुन दहशत निर्माण करीत असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने संशयिताला अटक केली. संशयातंकडून २५ आजार रुपये किमतीची शहरातून चोरी केलेली दुचाकी जप्त करण्यात आली. प्रवीण रवींद्र बागुल (वय-२०) रा. केवडी पुरा एरंडोल असे अटकेतील संशियताचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना एरंडोल शहरातील संशेत चोरीची दुचाकीसह गावठी कट्टा बाळगून असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना पथकाला कारवाईचे निर्देश दिले. शनिवारी १७ ऑगस्ट रोजी संशयिताच्या मुसक्या आल्यानंतर त्याच्याकडून २५ हजार रुपये किमतीच्या कट्टा व पच्चीस हजार रुपये किमतीची शहरातून चोरी केलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

सदर कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस सुनील नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, उपाधीक्षक गणेश वाघमारे, उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, हवालदार नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल बैसाणे, राहुल कोळी रवी कापडणे, चालक महेश सोमवंशी, आदींच्या पथकाने या कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *