चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत लासूर गावाजवळ मिळाले ३ गावठी बनावटी कट्टे व १२ जिवंत काडतुस.

चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत लासूर गावाजवळ मिळाले ३ गावठी बनावटी कट्टे व १२ जिवंत काडतुस.जिल्हा प्रतिनिधी समाधान कोळीचोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात एका गोपनीय बातमीदारामार्फत पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना आज दिनांक २५/०८/२०२४ रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास यांना गुप्त बातमी मिळाली की पार उमर्टी मध्यप्रदेश कडून सत्रासेन मार्गे लासुर गावाकडे एक मोटरसायकल व एक चारचाकी गाडी मध्ये अवैध गावठी बनावटी कट्टे व जिवंत काडतुस वाहतूक करून घेऊन जाणार आहे अशी बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितनवरे पोलीस काँस्टेबल किरण पारधी यांना मिळालेल्या बातमीची खात्री करत कारवाई करणे बाबत कळविल्याने सपोनि नितनवरे पोलीस काँस्टेबल किरण पारधी असे खाजगी वाहनाने पोलीस स्टेशन चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथून खाजगी वाहने रवाना होऊन लासूर गावाजवळ फौजी ढाब्या जवळ वाहने चेक करीत असताना मिळालेल्या बातमीनुसार एक मोटरसायकल शाईन कंपनीची काड्या रगांची तिचा आरटीओ पासिंग क्रमांक एम एच १६ बीएफ ४३६४ हीचेवर दोन इसम चारचाकी गाडी आणि अल्टो चा आरटीओ पासिंग क्रमांक एम एच १२ डीई ०९१० हिचेत २ इसम हे त्यांचे ताब्यात ३ गावठी बनावटी कट्टे व १२ जिवंत काडतुस असेअवैध वाहतूक करून घेऊन जात असताना मिळून आल्याने पोलीस कॉन्स्टेबल किरण पारधी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी नामे अक्षय सुरेश कुलवये रा.नागापूर एमआयडीसी अहमदनगर,मनोज नागरे रा.खल्ली पिप्री ता संगमनेर ह मु अहमदनगर,रमेश विठ्ठल आव्हाड रा.नागापूर अहमदनगर,अरबाज राज मोहम्मद शेख रा.दावत चौक नागापूर अहमदनगर यांच्याविरुद्ध हत्यार कायदा कलम ३/२५ ७/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक चाळीसगाव परिमंडळ उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा भाग चोपडा पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितनवरे पोलीस कॉन्स्टेबल किरण पार्टी यांचे पथकाने केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितनवरे व किरण पारधी हे करीत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *