जळगावात एकता संघटना तर्फे बुधवारी जिल्हास्तरीय धरणे आंदोल.

प्रतिनिधी शाहिद खान  जळगावात एकता संघटना तर्फे बुधवारी जिल्हास्तरीय धरणे आंदोलन जळगाव जिल्हा एकता संघटना नावाने अस्थायी स्वरूपात स्थापन झालेल्या संघटनेतर्फे जिल्हाधिकारी जळगाव कार्यालया बाहेर बुधवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.  धरणे आंदोलन का?

बदलापूर व कलकत्ता या ठिकाणी झालेल्या अत्याचारासह रामगिरी महाराज यांनी इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद (स व अ) यांच्याबाबत केलेले अपमानास्पद वक्तव्य या तिन्ही घटनांचा तीव्र निषेध सह सरकारचे खालील बाबीवर लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन होत आहे
१) जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनला रामगिरी महाराजांच्या विरोधात तक्रार अर्ज देऊन सुद्धा एकही एफ आय आर नोंदवली गेली नाही ती एका तरी पोलीस स्टेशनला त्वरित नोंदवावी.
२) दाखल झालेले गुन्ह्यात रामगिरी महाराज यांना त्वरित अटक करण्यात यावी.
३) प्रेषित, थोर महापुरुष,व धर्मा बाबत कोणी अपशब्द अथवा त्यांचा अपमान केल्यास त्यांच्यावर त्वरित कडक कारवाई करण्यासाठी खास कायद्याची निर्मिती करावी.
४) मुफ्ती सलमानअजहरी यांची त्वरित सुटका करण्यात यावी
५) वक्फ व मुस्लिम पर्सनल कायद्यात कोणत्याही स्वरूपाचे हस्तक्षेप होता कामा नये.
६) मुस्लिम समाजा विरुद्ध बुलडोझर नीतीचा वापर त्वरित थांबवावा
७) मुस्लिम तरुणावर व खास करून त्यांनी परिधान केलेल्या पोषाखावरून तसेच गोरक्षक नावाने होत असलेले हल्ले त्वरित थांबण्यासाठी मोबलिंचींग चा कायदा अस्तित्वात आणावा.
८) बलात्कार करणाऱ्याना फाशीची शिक्षा 30 दिवसाच्या आत द्यावी. सर्व धर्मीय लोकांनी सहभागी व्हावे – आवाहन या जिल्हास्तरीय धरणे आंदोलनाला समाजातील प्रत्येक नागरिकांनी सहभागी होऊन आपला निषेध नोंदवावा व एकता संघटने ला सहकार्य करावे असे आवाहन आयोका तर्फे करण्यात आलेले आहे.
एकता संघटनेची कार्यकारिणी हल्ली संघटनेची अस्थायी स्वरूपात जळगाव शहरातील २१ व प्रत्येक तालुक्यातील व इतर गावातील ३० अशी ५१ लोकांची कार्यकारणी तयार करण्यात आली आहे.भविष्यात तिला शासन दरबारी नोंदवण्याची प्रक्रिया होणार आहे ज्यामुळे जिल्ह्यात एकता संघटन निर्माण होईल जे पूर्णपणे राजकारण विरहित राहील असे संघटने तर्फे मुफ्ती खालिद,मुफ्ती अबुजर, हाफिज कासिम, हाफिज रहीम पटेल, सैय्यद चांद,फारुक शेख, नदीम मलिक, मजहर खान, अहमद सर, इरफान नुरी, तौसिफ शरीफ शाह,फिरोज शेख, सलीम इनामदार, युसुफ खान, अनिस शाह, मतीन पटेल, आरिफ देशमुख, अन्वर खान, आरिफ अजमल, कासिम उमर, झिया बागवान, युसुफ शाह, यांनी एका पत्रका द्वारे कळविले आहे. १)आंदोलनाचे परवानगी पत्र एकता संघटन चे फारुक शेख, नदीम मलिक, अन्वर खान, अहमद सर मुजहिद खान यांना देताना जिल्हा पेठ पो. स्टे. पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर दिसत आहे. २) परवानगी पत्र मिळाले बद्दल एकता संघटने तर्फे जिल्हा पेठ पो.स्टे. ला पोलिसांचे आभार व्यक्त करतांना कार्यकर्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *