कत्तलीसाठी जाणाऱ्या गाईची पोलिसांच्या सतर्कतेने सुटका.

पारोळा प्रतिनिधी:वाल्मीक पाटील. ‌ ‌ ‌‌ पारोळा : शहराती पहाटेच्या अमळनेर रस्त्यावर पहाटेच्या सुमारास तब्बल १२ गायींची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. पारोळा शहरातून जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जाणारा पिकअप वाहन सकाळी पहाटे ३ वाजेच्या सुमारास मालेगाव येथे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या गाई पकडण्यात पारोळा पोलिसांना यश आले आहे तत्पूर्वी, अवैधपणे गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती अमळनेर पोलिसांनी पारोळा पोलीस स्टेशनला दिली होती.

यावरून पारोळा पोलीस स्टेशनचे कर्मचारी अभिजीत पाटील यांनी गौरक्षक समाधान धनगर यांना कळवले असता अमळनेर रोड शनी मंदिराजवळ अवैधपणे गुरांची वाहतूक करणारी गाडी पकडण्यात आली. गायींना पिकअप वाहनातून निर्दयतेपणे कोंबून वाहतूक केली जात असल्याचे यावेळी निर्देशनास आले गाडी उभी केली असता गाडीतील चालक फरार झाला क्लीनंरला मात्र पारोळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या गायींना अमळनेर येथील गौवशाळेत रवाना करण्यात आले. यावेळी शाम पाटील, बजरंग दल चे जयवंत चौधरी, व शैलेश पाटील तसेच अमळनेर येथील पोलीस कर्मचारी पूनम हाटकर यांच्या मदतीने सदर कारवाई करण्यात आली. पुढील तपास पारोळा पोलीस स्टेशन पोलीस करत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *