गेल्या दहा वर्षात निष्क्रिय खासदार म्हणून खासदार रक्षा खडसे प्रसिद्ध आहेत का? नागरीक

भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आणि खासदार रक्षा खडसे यांच्या विरोधात मतदारसंघात आक्रोश आणि असंतोष अनेक ठिकाणी विचारला जातो आहे जाब

रावेर लोकसभा मतदारसंघातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या दहा वर्षे खासदार असलेल्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारा दरम्यान मतदार त्यांना विकास कामा संदर्भात प्रश्न विचारून धारेवर धरत आहेत. मतदारसंघात कोणती कामे आपण व्यक्तिगत लक्ष घालून केलीत असा प्रश्न त्यांना विचारून त्रस्त केले जात आहे. यावर रक्षा खडसे ही निरुत्तर होऊन आल्या पावली माघारी फिरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.


चोपडा तालुक्यातील धानोरा येथे शनिवारी असा प्रकार घडल्यानंतर आज रविवारी रावेर तालुक्यातील कोचूर येथेही असाच प्रकार घडला आहे. याबाबतची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली असून त्यात नागरिक खासदार रक्षा खडसे यांना मतदारसंघात केलेली कोणतीही चार विकास कामे सांगा असा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारताना दिसत आहेत. यावर भाजपच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी त्या मतदारांची कशीबशी समजूत काढली आणि रक्षा खडसे आल्या पावलीच परत गाडीत बसल्या अशी व्हिडिओ क्लिप विविध समाज प्रसार माध्यमांवर व्हायरल झाली आहे.


गेल्या दहा वर्षात निष्क्रिय खासदार म्हणून खासदार रक्षा खडसे प्रसिद्ध आहेत. केवळ ठिकठिकाणी सिमेंटचे बाकडे आणि हायमास्ट दिवे लावण्याचे काम त्यांनी फक्त केले आहे. यामुळे मतदार संघात त्यांच्याविरुद्ध प्रचंड असंतोष असून ठिकठिकाणी त्यांना धारेवर धरल्याचे प्रकार घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांनाच आता संधी देऊ असा मतदारांचा कल प्रचारात असल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांनाही आढळून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *