देवरे विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा.

देवरे विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजराश्री.धंगाई विधायक कार्य मंडळ संचलित आप्पासाो. आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण ता.जि.नंदुरबार येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धेचा आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डी. डी.साळुंके तर प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा तपासणी करण्यासाठी आलेले केंद्र शाळा शिंदे येथील केंद्र प्रमुख नितीन पवार,पियुष पाटील,मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय,समशेरपुर,मनोज पवार, मुख्याध्यापक,जि.प. शाळा,शिंदे यांच्या हस्ते हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक क्रीडा शिक्षक व्ही.बी.अहीरे यांनी मांडले.विद्यालयाच्या निसर्गरम्य अशा वातावरणात विविध क्रीडा प्रकार खो खो,रनिंग,कबड्डी, गोळा फेक,थाळीफेक, भालाफेक, लांब उडी,उंच उडी, हॉलीबॉल, लिंबू- चमचा, लंगडी-लंगडी आधी खेळांचं आयोजन करण्यात आले होते.प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगताद्वारे विखरण विद्यालयातील विद्यार्थ्यां क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.अध्यक्षीय भाषणातून डी.डी.साळुंके यांनी मेजर ध्यानचंद यांच्या तत्कालीन अविस्मरणीय,अविश्वसनीय कार्यकर्तृत्वाची ओळख करून दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी.व्ही.नांद्रे तर आभार एम.डी.नेरकर यांनी मांडले क्रीडा स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी डी.बी.भारती ,वाय.डी.बागुल एस एच गायकवाड,आर. आर.बागुल,एम.एस.मराठे, डी.बी.पाटील,एस.जी.पाटील ,
एच.एम.खैरनार आदींनी संयोजन व सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *