पत्रकार बापू ठाकरे यांचा चिरंजीव झाला पोलीस.

पत्रकार बापू ठाकरे यांचा चिरंजीव झाला पोलीस

नंदुरबार जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघटनेतर्फे पोलीस शिपाई कमलेश ठाकरे याचा गौरवनंदुरबार- जिल्ह्यात नुकतीच १५१ पदांसाठी पोलीस शिपाई पदाची भरती घेण्यात आली. यात ९ हजार जणांचे अर्ज आले होते. यामध्ये सा.कडकडाटचे संपादक बापू ठाकरे यांचे चिरंजीव कमलेश बापू ठाकरे याने जिद्द अन् चिकाटीच्या जोरावर दुसऱ्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली आहे. त्याची नंदुरबार जिल्हा पोलीस दलात निवड झाली आहे. यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी नंदुरबार जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघातर्फे नंदुरबार येथील नाट्य मंदिरात कमलेशसह आई-वडिलांचा सामूहिक सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन नंदुरबार जिल्हा साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेतर्फे करण्यात आले होते. याप्रसंगी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष हंसराज चौधरी, किसन जाधव, विशाल माळी, महादू हिरणवाळे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी साप्ताहिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गवळे, जितेंद्र जाधव, अखिल पिंजारी, प्रविण चव्हाण, सुभाष राजपूत, मनोज शमशेर, हिरालाल मराठे आदी उपस्थित होते.दरम्यान ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्यपदी महादू हिरणवाळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार तर ज्येष्ठ पत्रकार किसन जाधव यांचा वाढदिवस असल्याने त्यांचाही यावेळी केक कापून साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेतर्फे सन्मान करण्यात आला.कमलेशचा आनंद गगनात मावेना पोलीस शिपाईपदी निवड झाल्याच्या संदेश रात्री ११ वाजेला आल्याचे कळल्यानंतर कमलेश ठाकरे याने प्रथम आई-वडिलांना याबाबतची माहिती दिली.यानंतर त्याच्यासह आई-वडिलांना खूप आनंद झाला. कारण पोलीस शिपाई पदासाठी कमलेशने खूप परिश्रम घेतले होते. पहिल्यांदा यश मिळाले नाही मात्र खचून न जाता त्याने दुसऱ्यांदा पोलीस भरतीसाठी प्रयत्न सुरू ठेवला. नंदुरबार येथे पोलीस भरती भरतीची परीक्षा दिल्यानंतर त्याने मुंबई येथे देखील पद भरतीसाठी अर्ज केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *