पीक विम्याची रक्कम मिळण्यासाठी कृषी आयुक्त कार्यालयावर मोर्चा.

चलो पुणे ! चलो पुणे!! चलो पुणे!!!

पीक विम्याची रक्कम मिळण्यासाठी कृषी आयुक्त कार्यालयावर मोर्चापारोळा प्रतिनिधी : वाल्मीक पाटील शेतकरी भावांनो आणि माय बहिणींनो,नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागू नये म्हणून सरकारने पंतप्रधान फसल विमा योजना सुरू केली. पिकाचे नुकसान झाल्यावर लगेचच शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई मिळावी हा हेतू आहे. मात्र २०२३-२४ या वर्षाच्या खरीप व रब्बी हंगामातील पीक विम्याचे पैसे दीड वर्ष झाले तरी मिळाले नाहीत. यासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलने झाली. प्रत्येक वेळेला आश्वासने दिली, तारखा दिल्या मात्र विम्याचे पैसे दिले नाहीत.या दिरंगाईला विमा कंपनी जवाबदारी नाही तर सरकार जवाबदार आहे. सरकारने विमा कंपनीला पैसे न दिल्यामुळे विमा कंपनी शेतकऱ्यांना पैसे देऊ शकत नाही हे स्पष्ट झाले आहे. आपले पैसे वसूल करण्यासाठी सरकारला जाब विचारायला हवा. यासाठी पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयावर, स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली मोर्चा आयोजित केला आहे. महाराष्ट्र भरातील शेतकरी मोर्चा घेऊन जाणार असून सरकारकडे पैशाची मागणी करणार आहेत.दिनांक ९ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वा पुणे स्टेशन येथील गांधी पुतुळ्या पासून, साधू वासवानी चौक मार्गे, शेतकरी मोर्चाने सेंट्रल बिल्डिंग येथील कृषी आयुक्त कार्यालयावर जाणार आहेत.महाराष्ट्रातील ज्या ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले नाहीत त्यांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ही अपेक्षा आहे. आपली संख्या हीच आपली ताकद आहे. घरी बसून आपले हक्काचे पैसे मिळणार नाहीत. दिनांक ९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता, पुणे स्टेशन येथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे.अनिल घनवट राष्ट्रीय अध्यक्ष,स्वतंत्र भारत पक्ष ललित बहाळे अध्यक्ष, शेतकरी संघटना मधुसूदन हरणे प्रदेशाध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्ष सीमा नरोडे प्रदेशाध्यक्षा, स्वतंत्र भारत पक्ष महिला आघाडी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *