उत्राण हायस्कूलचे प्रा. डॉ. भरत शिरसाठ यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर.

उत्राण हायस्कूलचे प्रा. डॉ. भरत शिरसाठ यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीरधरणगाव तालुका प्रतिनिधी – राजु बाविस्कर, धरणगाव : जे. एस. जाजू हायस्कूल उत्राण येथील सहशिक्षक भरत आत्माराम शिरसाट यांना साहित्यरत्न अण्णा साठे बहुउद्देशीय सेवा समिती, महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत यावर्षी दिला जाणारा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या निवडीचे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.साहित्यिक प्रा.भरत शिरसाट  यांची एकूण २५ वर्ष सेवा झाली असून ते इंग्रजी विषयाचे शिक्षक आहेत. इंग्रजी व शिक्षण शास्त्र या दोन विषयांमध्ये ते सेट परीक्षा उत्तीर्ण आहेत. साहित्य क्षेत्रामध्ये त्यांनी भरीव योगदान दिले आहे. त्यांची मराठी भाषेत पाच पुस्तके प्रकाशित आहेत. ‘शिक्षक कसा असावा’ हे वैचारिक पुस्तक, ‘सत्यशोधक आणि इतर कथा’ हा कथासंग्रह, ‘खैरलांजी आणि भीमा कोरेगाव’, ‘बकध्यान’ हे दोन कवितासंग्रह, ‘संविधानाचे अनंत उपकार’ हा वैचारिक ग्रंथ इत्यादी त्यांची मराठीतील साहित्य संपदा आहे. पद्मपाणि संस्था, बीड येथील चालू वर्षाचा उत्कृष्ट साहित्यिक पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. प्रा.शिरसाट यांचे इंग्रजी विषयांमध्ये सुद्धा लेखन असून ‘चॅलेंजेस अँड एक्स्पेक्टेशन्स इन टीचिंग अँड लर्निंग इंग्लिश’, इलिस सुविनियर, इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. इंग्रजी विषयाच्या अनेक प्रशिक्षणामध्ये त्यांनी जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केलेले आहे. एससीइआरटी, पुणे यांचे मार्फत आयोजित राज्यस्तरीय सेवांतर्गत वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणामध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून तसेच मार्गदर्शिका लेखन समिती सदस्य म्हणून त्यांनी काम केलेले आहे. इंडिया-बांगलादेश टेलिकोल्याबोरेशन प्रोजेक्टचे जळगाव जिल्हा कोऑर्डिनेटर म्हणून त्यांनी काम केले आहे. राज्यातील इंग्रजी विषय शिक्षकांच्या ‘इलिस’ प्रोजेक्ट मध्ये मेंटाॅर म्हणून त्यांनी काम केले आहे. इंग्रजी विषय शिक्षकांच्या ‘चेस’ प्रोजेक्टमध्ये त्यांनी ‘एमइआर’ म्हणून काम केले आहे. प्रादेशिक विद्या प्राधिकरण नाशिक येथे नाशिक विभागाकरिता इंग्रजी विषय सहाय्यक म्हणून त्यांनी दोन वर्ष काम केले आहे. इंग्रजी विषयाच्या मान्यताप्राप्त जर्नल्स मध्ये त्यांचे रिसर्च पेपर पब्लिश झालेले आहेत. शैक्षणिक व सामाजिक विषयावर त्यांनी अनेक व्याख्याने दिलेली आहेत. जळगाव जिल्हा इंग्लिश टीचर्स वेल्फेअर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच म.रा. समता शिक्षक परिषदेचे माध्यमिक विभागाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *