आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. व मयत मुलीच्या कुटुंबियांना न्याय देण्यात यावा यासाठी तहसीलदार चोपडा यांना निवेदन दिले.

आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. व मयत मुलीच्या कुटुंबियांना न्याय देण्यात यावा यासाठी तहसीलदार चोपडा यांना निवेदन दिले..जिल्हा प्रतिनिधी समाधान कोळी  चोपडा तालुक्यातील रहिवाशी असलेल्या दोन बहिणी काम करून शेतातून घरी परत येत असतांना १२ वर्षीय एका मुलीवर गौजे विरवाडे शिवारातील शेतामध्ये ओढून नेऊन चिमुरड्या मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिचा दगडाने ठेचून निघृण हत्या केली. त्यानंतर संशयिताने विवस्त्र अल्पवयीन मुलीला घटनास्थळापासून कापसाच्या शेतात ओढत नेत फेकून दिल्याची घटना उघडकीस आलेली आहे. या घटनेचा एन.एस.यु.आय.चे सरचिटणीस धनंजय चौधरी यांच्या सह एन.एस.यु.आय.चे सदस्य यांनी तीव्र निषेध नोंदवण्यात आला.तसेच  दोषी असणाऱ्या आरोपीचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून त्वरित आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. व मयत मुलीच्या कुटुंबियांना न्याय देण्यात यावा यासाठी तहसीलदार चोपडा यांना निवेदन दिले सोबत भुपेंद्रभाऊ जाधव(एन.एसयु.आयजिल्हाअध्यक्ष),चेतनबाविस्कर(एन.एस.यु. आय प्रदेश सरचिटणीस)घनश्याम पाटील(एन.एस.यु.आय जिल्हाउपाध्यक्ष),सकलेन शेख,टेनू सोनार व एन.एस.यु.आय मित्रपरिवार उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *