महायुतीच्या उमेदवार डॉ. हिनाताई गावित यांनी आज प्रचाराच्या दुसऱ्या दिवशी नवापूर शहर पिंजून काढले.

नंदुरबार – महायुतीच्या तथा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांनी आज प्रचाराच्या दुसऱ्या दिवशी नवापूर शहर पिंजून काढले. नवापूर शहरातील जुन्या आणि नव्या प्रत्येक वसाहतीत प्रचार फेरी काढून त्यांनी मतदार बंधू भगिनींना आवाहन केले.

नंदूरबार प्रतिनिधी सुरेश बोरसे


उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या समवेत माजी आमदार शरद गावीत, डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावीत, जि.प महिला बालकल्याण सभापती संगिता गावीत, भाजपचे अल्पसंख्याक मोर्चाचे उपाध्यक्ष एजाज शेख यांनी या प्रचार फेरीचे नेतृत्व केले. नवापूर शहरातील मंगलदास पार्क जनता पार्क मुख्य बाजारपेठ यासह सर्व नव्या जुन्या वसाहतींमधून प्रचार फेरी काढण्यात आली त्याप्रसंगी प्रमुख चौकात तसेच अनेक ठिकाणी गृहिणींनी उत्स्फूर्तपणे उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांचे औक्षण केले तर काही ठिकाणी फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. गरीब कष्टकऱ्यांच्या वसाहतीमध्ये थांबून काही ठिकाणी डॉक्टर हिनाताई गावित यांनी संवाद केला. या प्रचार फेरीत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अमृत लोहार, भाजपचे तालुका अध्यक्ष सत्यानंद गावीत,तालुका उपाध्यक्ष जतनसिंग वसावे,अजय गावीत,भाजपचे माजी शहर अध्यक्ष प्रणव सोनार,शहर अध्यक्ष दिनेश चौधरी ,जयेंद्र चव्हाण,,निलेश देसाई,माजी नगरसेवक महेंद्र दुसाने,चंद्रकांत नगराळे,अनिल दुसाने,जगदीश जयस्वाल,सत्यपाल वसावे,राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष शरद पाटील, इंद्रीस टिनवाला,इलेश गावीत,मनोज वळवी,भाजपचा जिग्नेश राणा,सविता जयस्वाल,माजी नगरसेविका सुनिता वसावे,जितेंद्र अहिरे,भीमसिंग पाडवी ,निलेश प्रजापत,सौरव भामरे,जिवन गावीत,सप्नील मिस्ञी, शंभु सोनार, हेमंत शर्मा, गोपी सेन,शुभम पाटील सह भाजपा महायुतीचे पदधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *