रावेर पोलीसांनी एकुण १७,०००/- रु किं च्या तीन बकऱ्या आरोपीताकडू हस्तगत.

रावेर पोलीसांनी एकुण १७,०००/- रु किं च्या तीन बकऱ्या आरोपीताकडू हस्तगत.

प्रतिनिधी जुम्मा तडवी रावेर- रावेर पोलीस स्टेशन सीसीटीएनएस गुरन ४५७/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक १९/०२/२०२४ रोजी दुपारी १४.०० वाजता कुसुंबा बु गावी पाझर तलावाचे वरील जंगलातून फिर्यादी गोपाल अर्जुन पिसाळ वय ५५ वर्ष व्यवसाय मेंढपाळ रा. मुंजलवाडी ता रावेर जि जळगांव यांच्या मालकीच्या तीन वकऱ्या कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी कुसुंबा बु गावी पाझर तलावाच्या वरील जंगलात चारत असतांना अज्ञात आरोपीतांनी फिर्यादीच्या समंतीवाचुन लबाडीच्या ईराद्याने चोरुन नेली आहे. म्हणून अज्ञात चोरट्या विरुध्द फिर्याद गोपाल अर्जुन पिसाळ वय ५५ वर्ष व्यवसाय मेंढपाळ रा. मुंजलवाडी ता रावेर जि जळगांव यांनी रावेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता.गुन्हयात चोरीस गेलेल्या तीन बकऱ्या व अज्ञात आरोपीतांचा शोध घेणे कामी मा. पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी सो, मा. अशोक नखाते सो, अपर पोलीस अधिक्षक जळगांव,  अन्नपूर्णा सिंह, सहाय्यक पोलीस अधिक्षक फैजपुर, पोलीस निरीक्षक डॉ.  विशाल जयस्वाल यांनी आदेशीत केले होते,

दिनांक २०/०९/२०२४ रोजी पोहेको रविंद्र वंजारी, पोको सचिन घुगे पोकों/ विशाल पाटील, पोकों/प्रमोद पाटील पोकों महेश मोगरे, मुंजलवाडी कुसुंबा लालमाती रसलपुर अभोळा या परीसरात चोरीस गेलेली तीन वकऱ्यांचा व अज्ञात आरोपीताचा शोध घेणे कामी रवाना झाल्यावर गुप्त बातमीदाने कळविले की आरोपी क्रमांक (१) तर्नावर रफिक तडवी वय १९ वर्ष (२) शरीफ जहाबाज तडवो वय २५ वर्ष, (३) कलीम हमीद तडची वय ३३ वर्ष (४) अजरुद्दीन महेमूद तडवी वय २० वर्ष सर्व रा. कुसुंबा खु ता रावेर जिल्हा जळगांव यांना ताब्यात घेवुन रावेर पोलीस स्टेशन येथे घेवून आले असता सदर आरोपीतांना विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्यांनी तीन बकऱ्या चोरी केल्याची कबुली दिली असुन त्याच्या ताब्यातुन एकूण १७,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस निरीक्षक  डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ/3201 सिकंदर रमजान तडवी हे करीत आहे.सदर गुन्ह्याची उकल  पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी सो, अशोक नखाते सो, अपर पोलीस अधिक्षक जळगांव,  अन्नपूर्णा सिंह, सहाय्यक पोलीस अधिक्षक फैजपुर, पोनि डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोकौं। सचिन घुगे पोकों/ विशाल पाटील, पोकों/प्रमोद पाटील पोकों/महेश मोगरे यांच्या पथकाने कार्यवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *