भडगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे ‘महर्षी भृगू’ यांचे नाव
भडगाव तालुका प्रतिनिधी : यशकुमार पाटील
भडगाव : भडगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे ‘महर्षी भृगू शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भडगाव जि. जळगाव’ असे नामकरणाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याचे कळते. महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाना थोर महापुरुष, स्वातंत्र्यसैनिक किंवा समाजसुधारकांची नावे देण्याचा निर्णय राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने घेतला होता. त्या अनुषंगाने भडगाव येथील भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अँड. अमोल नाना पाटील यांनी दि. २६ सप्टें. २०२४ रोजी पत्रान्वये संबंधित विभागाचे मंत्री मा. मंगलप्रभात लोढा यांचेकडे प्रत्यक्ष भेटून भडगाव येथील संस्थेस महर्षी भृगू शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भडगाव जि. जळगाव असे करण्याची मागणी केली होती. महर्षी भृगू यांचे भडगाव येथे वास्तव्य होते. भडगाव शहरातून प्रवाहित होणाऱ्या गिरणा नदीच्या काठावर महर्षी भृगू यांनी ऐतिहासिक अशा ‘भृगू संहिता’ या ग्रंथाचे लिखाण केले आहे. तसेच भडगावचे नाव हे भृगूग्रामचा अपभ्रंश होत भडगाव असे रुढ झाले आहे. या ऐतिहासिक वारश्याचे नित्यस्मरण होईल व ऐतिहासिक वारसा जोपासण्यास या नामकरणामुळे निश्चित मदत होणार आहे. असे अँड. अमोल पाटील यांनी दिलेल्या प्रस्तावात नमूद आहे.