एरंडोल तालुक्यातील शेकडो महिलांचा मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादीत प्रवेश

एरंडोल तालुक्यातील शेकडो महिलांचा मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादीत प्रवेश


पारोळा प्रतिनिधी ; वाल्मीक पाटील


अमळनेर – जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील शेकडो महिलांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून डॉ. संभाजी राजे पाटील यांच्या नेतृत्वात व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी मंत्री पाटील यांनी सर्व महिला भगिनींचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले. यावेळी जि प सदस्या जयश्री पाटील,राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अभिलाषा रोकडे डॉ अनघा पाटील, एरंडोल विधानसभा क्षेत्रप्रमुख डॉ महेश पाटील एरंडोल महिला तालुकाध्यक्ष जयश्री पाटील उपस्थित होते.महिला सन्मानासाठी व सबलीकरणासाठी कायमच तत्पर असणाऱ्या या पक्षात सर्व भगिनींचे स्वागत केले असून त्यांच्या येण्याने पक्षाची ताकद अजून वाढली असून पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी त्या सक्रियपणे कार्यरत राहतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *