तापी नदीकाठावर सिनेस्टाई थरार, सिव्हिल ड्रेसवर अधिकारी आले, धाड टाकली, आणि.

तापी नदीकाठावर सिनेस्टाई थरार, सिव्हिल ड्रेसवर अधिकारी आले, धाड टाकली, आणि.

काही महिन्यांपूर्वी जळगावच्या जिल्हा नियोजन बैठकीत अवैध दारुविक्री, हातभट्ट्या यावरुन प्रचंड वातावरण तापलं होतं. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी या प्रकरणावरुन मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तक्रार केली होती.

त्यामुळे जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असलेल्या अवैध हातभट्ट्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्काकडून कठोर कारवाई केली जात आहे. खरंतर सध्या विघानसभा निवडणुकीचं वातावरण आहे. त्यामुळे देखील राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस प्रशासन अलर्टवर आहे. कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार कुठेही घडू नये यासाठी अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसेच अवैध दारु निर्मिती भट्ट्या चालवणाऱ्यांना हेरुन त्यांच्या मुसक्या आवळण्याचं काम सध्या सुरु आहे. राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने अशीच एक सिनेस्टाईल कारवाई जळगाव जिल्ह्यात तापी नदीच्या काठावर केली आहे.

उत्पादन शुल्क विभागाच्या डॅशिंग पथकाकडून तापी नदीकाठावरील अवैध दारू निर्मिती करणाऱ्या भट्ट्या उद्धवस्त करण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने गावठी दारू हातभट्टी निर्मिती केंद्रांवर कारवाई केली जात आहे. अशाच एका कारवाईत जळगाव तालुक्यातील भोलाणे, देऊळवाडे, शेळगाव येथील तापी नदीच्या काठावर दारू तयार करणाऱ्या भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत.

4 लाख 90 हजार 950 रुपयांच्या मुद्देमालाचा नाश

या कारवाईनंतर एकूण 7 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच या कारवाईत 12320 लिटरचे कच्चे रसायन आणि 145 लिटर गावठी हातभट्टी दारूचा नाश करण्यात आला आहे. एकूण 200 लिटर मापी, संपूर्ण कच्चा रसायने भरलेले प्लास्टिकचे 69 ड्रम जाळून तोडून फोडून नष्ट करण्यात आले. त्यात एकूण 4 लाख 90 हजार 950 रुपयांच्या मुद्देमालाचा नाश करण्यात आला आहे.

संबंधित कारवाई जळगावचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक डॉ. व्ही. टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख निरीक्षक डी. एम. चकोर, निरीक्षक ए.पी. तारू, के. डी. वराडे, एस. बी. भगत, सी.आर शिंदे, आर. डी. सोनवणे, एस. बी. चव्हाणके, एस. एम. मोरे, दुय्यम निरीक्षक जी.डी अहिरे, आर. डी जंजाळे, ए. डी. पाटील, डी. एस. पावरा, एस. आर. माळी, एन. आर. नन्नवरे, व्ही. टी हटकर, एन. व्ही. पाटील, आर. पी. सोनवणे, आर. टी. सोनवने या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *