लग्न तिथीमुळे पारोळ्यात रस्त्यावर वाहतूक कोंडी. ‌‌

लग्न तिथीमुळे पारोळ्यात रस्त्यावर वाहतूक कोंडी. ‌‌

पारोळा प्रतिनिधी;वाल्मीक पाटील.

शहरातून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प आहे यामुळे शहरातील रस्त्यांवर वाहतुकीच्या मोठ्या प्रमाणात खेडंबा होत आहे. वाहनांचा रांगा लागून इतरांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या गंभीर प्रकाराकडे पोलिसांनी लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी होत आहे. शहरातील राष्ट्रीय महामार्गावर क्र.६ वरील बस स्थानकापासून भडगाव व कजगाव चौफुलीवर आज आठवडे बाजार असल्याने तसेच लग्न तीथ मोठी असल्यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली होती.

या वाहतूक कोंडीला कारणीभूत असलेले रस्त्यावरील ठेलावड्या तसेच वाहन चालक त्यांची वाहने हे रस्त्याच्या खाली न थांबवता रस्त्यावर उभे करून प्रवासी बसवणे व उतरवतात. त्यामुळे वाहतुकीचा कोळंबा होऊन राहदारीला अडथळा निर्माण होत आहे. रोजची ही समस्या झाली असताना देखील या प्रकाराकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करीत आहे. कजगाव रस्त्यावरील दुकानांसमोर उभे राहत असलेली वाहनांमुळे देखील वाहतुकीला अर्चना निर्माण होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *