धामणगाव विधानसभेचे भाजपचे उमेदवार प्रताप अडसड यांच्या बहिणीवर हल्ला,

Crime : धामणगाव विधानसभेचे भाजपचे उमेदवार आमदार प्रताप अडसड यांच्या बहिणीवर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार प्रतापदादा अडसड यांच्या भगिनी अर्चनाताई रोटे (अडसड) यांच्यावर सातेफळ जवळ चाकू हल्ला करण्यात आलाय.

प्रताप अडसड यांच्या सर्व प्रचाराची धुरा त्यांच्या बहिणीकडे आहे. सकाळ पासून सायंकाळ पर्यंत त्या गावा गावात जाऊन प्रचार करत आहेत. मात्र, आज रात्री सातेफळ फाट्याजवळ 7 ते 8 जण अज्ञातांनी त्यांच्यावर चालूने हल्ला केलाय.

छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूरमध्ये अपक्ष उमेदवाराच्या कारवर हल्ला

छत्रपती संभाजी नगरमधील गंगापूर विधानसभा मतदारसंघात उभा असलेल्या अपक्ष उमेदवाराच्या गाडीवर हल्ला झालाय. अपक्ष उमेदवाराच्या कारवर दगडफेक दगडफेक करण्यात आलीये. सुरेश सोनवणे असं हल्ला झालेल्या अपक्ष उमेदवाराचे नाव आहे. गळणीम रोडवर सोनवणे यांची गाडी अडवत 10 ते 15 लोकांच्या जमावाने दगडफेक केल्या प्रकार समोर आलाय. दरम्यान, यामध्ये उमेदवार सोनवणे यांच्यासह तीन ते चार जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी वाळूज टोल नाक्याजवळील जवळील सी एस एम एस हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *