रात्र वैऱ्याची आहे! पुण्यात ट्रकमध्ये सापडला मोठा साठा, 1361 वस्तू पाहून पोलीसही चक्रावले

 विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार तोफा अखेर थंडावल्या आहे. आता दोन दिवसांनी मतदान होणार आहे. पण अशातच पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये नगर- कल्याण महामार्गावर एसएसटी पथकाने प्रेशर कुकरचा ट्रक पकडला आहे. या ट्रकमध्ये तब्बल 1361 कुकर आढळले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.  जुन्नर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी प्रचाराची सांगता झाली असून २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. जुन्नर निवडणूक अनेक कारणांनी चर्चेत राहिली. त्यातच नगर-कल्याण महामार्गावर आणे एसएसटी पथकाने सोमवारी दुपारी नाकाबंदी सुरू असताना प्रेशर कुकर घेऊन येणारा ट्रक ताब्यात घेतला. या ट्रकमध्ये १३६१ कुकर मिळून आले आहे. या पार्श्वभूमीवर आता आचारसंहिता कक्ष अलर्ट मोडवर आल्याचे दिसून येत असून पुढील तपास केला जात आहे.

याबाबत आळेफाटा पोलिसांनी सांगितलं की, नगर कल्याण महामार्गावर आणे एसएसटी पथकाला एक ट्रक प्रेशर कुकर घेऊन येणारा ट्रक मिळून आला. त्याची बिल्टी चेक केली असता ट्रक लातूर येथून अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यात माल पोच करण्यासाठी जाणार होता. मात्र ट्रक राहुरीकडे न जाता आळेफाटा दिशेनं येत होता म्हणून संशय आला. त्यांनी ट्रक आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात दिला असता पोलिसांनी चालकाकडे अधिकची चौकशी केली असता त्याने आळेफाटा येथे प्रेशर कुकरचा ट्रक घेऊन येण्यास सांगितलं असं सांगितलं.

ट्रकमधील १३६१ प्रेशर कुकर आळेफाटा इथं काही लोकांना वाटले जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. विशेष म्हणजे, याच मतदारसंघात अपक्ष उमेदवर आशा बूचके यांचं चिन्ह हे कुकर असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. या प्रकरणाची पोलिसांनी अधिकची माहिती निवडणूक विभागाला दिली असून अधिकचा तपास करून पुढील कारवाई केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *