डॉक्टर प्रियकराने प्रेयसीला २० वेळा भूल दिली, मृत्यू झाला.

हा तासांत २० वेळा भूल दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. प्रियकर असलेल्या डॉक्टरने तिच्या झोपेच्या समस्येवर उपचार म्हणून सतत भूल दिली. मात्र, महिलेच्या मृत्यूनंतर प्रियकर डॉक्टरवर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

नैऋत्य चीनमधील सिचुआन प्रांतातील लेशान येथील जियाजियांग काउंटीतील एका रुग्णालयातील भूलतज्ज्ञ क्यू याला खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याची प्रेयसी चेन हिचा मृत्यू झाला आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, २०२२ मध्ये एका ऑनलाइन डेटिंग प्लॅटफॉर्मद्वारे दोघांची ओळख झाली. त्यानंतर दोघेही प्रेमात पडले आणि महिलेने तिच्या झोपेच्या समस्येबद्दल डॉक्टर असलेल्या तिच्या प्रियकराला सांगितले. झोपेची कमतरता कमी करण्यासाठी तिला भूल देण्याची विनंती तिने त्याला केली होती, असे वृत्त आहे. महिलेचा मृतदेह ७ मार्च रोजी सापडला. ६ मार्च रोजी रात्री ११ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजेपर्यंत सहा तासांत क्यूने चेनला सुमारे १,३०० मिलीग्राम प्रोपोफोल भूल औषध २० पेक्षा जास्त वेळा इंजेक्शनद्वारे दिले. याशिवाय, ७ मार्च रोजी सकाळी हॉटेलच्या खोलीतून बाहेर पडताना क्यूने चेनला १०० मिलीग्राम प्रोपोफोल स्वतः वापरण्यासाठी दिले. नंतर खोलीत परतल्यावर क्यूने चेनला मृतावस्थेत पाहिले. क्यूने ताबडतोब पोलिसांना माहिती दिली आणि घडलेली घटना सांगितली. त्याने चेनच्या नातेवाईकांना ४००,००० युआन (५५,००० अमेरिकी डॉलर) नुकसान भरपाई म्हणून दिले, असे साउथ चायना मॉर्निंग पोस्टने वृत्त दिले आहे. वैद्यकीय तपासणीत महिलेच्या मृत्यूचे कारण प्रोपोफोलचा अतिवापर असल्याचे आढळून आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *