बैलानेच मालकावर हल्ला करून जीवे ठार मारल्याच्या प्रकार घडला

बैलाने घेतला मालकाचा जीव. बैलानेच मालकावर हल्ला करून जीवे ठार मारल्याच्या प्रकार घडला

पारोळा प्रतिनिधी ; वाल्मीक पाटील

बैलाला पाणी पाजण्यासाठी सोडले असता बिचारलेल्या बैलानेच मालकावर हल्ला करून जीवे ठार मारल्याच्या प्रकार घडला आहे. पारोळा तालुक्यातील टिटवी प्रकाश तोताराम पाटील वय ५७ हे पशु मालक शनिवारी दुपारी साडेचार च्या सुमारास टिटवी शिवारातील शेतात आपल्या बैलांना पाणी पाजण्यासाठी सोडले असता यावेळी त्यातील एक बैल भितरून त्यांच्या अंगावर शिंगाने हल्ला केल्याने त्यांना हात पायास, छातीस व डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्यांना पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत देविदास पाटील यांच्या खबरीवरून पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पुढील तपास हवालदार सुधीर चौधरी हे तपास करीत आहे. दरम्यान बैलानेच मालकाच्या जीव घेतल्याने टिटवी गावासह तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.बैलाने घेतला मालकाचा जीव. पारोळा प्रतिनिधी;वाल्मीक पाटील बैलाला पाणी पाजण्यासाठी सोडले असता बिचारलेल्या बैलानेच मालकावर हल्ला करून जीवे ठार मारल्याच्या प्रकार घडला आहे. पारोळा तालुक्यातील टिटवी प्रकाश तोताराम पाटील वय ५७ हे पशु मालक शनिवारी दुपारी साडेचार च्या सुमारास टिटवी शिवारातील शेतात आपल्या बैलांना पाणी पाजण्यासाठी सोडले असता यावेळी त्यातील एक बैल भितरून त्यांच्या अंगावर शिंगाने हल्ला केल्याने त्यांना हात पायास, छातीस व डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्यांना पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत देविदास पाटील यांच्या खबरीवरून पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार सुधीर चौधरी हे तपास करीत आहे. दरम्यान बैलानेच मालकाच्या जीव घेतल्याने टिटवी गावासह तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *