नाशिक येथे डाॅक्टर पेशातील देवदुत म्हणुन प्रसिध्द असलेले डाॅ.दत्तप्रसादजी_मोरे यांना यंदाचा भारतज्योती प्रतिभा एक्सलन्स अवॉर्ड २०२४ जाहीर…..

नाशिक येथे डाॅक्टर पेशातील देवदुत म्हणुन प्रसिध्द असलेले डाॅ.दत्तप्रसादजी_मोरे यांना यंदाचा भारतज्योती प्रतिभा एक्सलन्स अवॉर्ड २०२४ जाहीर…..

डाॅ.दत्तप्रसादजी मोरे हे मागील २५ वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक,पर्यावरण,गिर्यारोहण व वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून त्यांना सार्वजनिक क्षेत्रातील कार्याचा तसेच 25 वर्ष सेवेच्या रोप्य महोत्सवी हा गौरव सन्मान मिळत आहे हे नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे २६ मे रोजी पुणे येथे भव्य कार्यक्रमात त्यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान होणार आहे,भारतज्योती सन्मान पुरस्कार निवडीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदननाचा वर्षाव होत आहे.

डाॅ.मोरे हे मागील २५ वर्षांपासून आरोग्य,सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरण,गिर्यारोहण क्षेत्रात कार्यरत असून त्यांना सार्वजनिक व वैद्यकीय क्षेत्रात कार्याचा दांडगा अनुभव आहे. कोवीड काळात शेकडो लोकांना जीवदान देणारे देवदूत म्हणून सन्मान तसेच उत्कृष्ट कार्यात जिल्हास्तरीय अनेक पुरस्कार त्यांना मिळाले असून ते हरि ओम हॉस्पिटलचे संचालक आहेत.

चिमुकल्यांसाठी सुवर्ण बिंदू प्राशन शिबीर,महिलांच्या आरोग्यासाठी कॅन्सर,गर्भाशयातील कर्करोग रोखण्यासाठी वेळोवेळी आरोग्य तपासणी शिबिर, तसेच अनाथ आश्रम वृद्धाश्रमात मोफत आरोग्य तपासणी शिबिर,कष्टकरी कामगार,सर्वसामान्य जनतेसाठी मसिहा तसेच माणसातील खरा आरोग्य दुत म्हणून त्यांची ओळख आहे. या वैद्यकीय सेवेत त्यांची पत्नी डाॅ.दिपीका मोरे यांचे देखील मोलाचे सहकार्य व खंबीर अशी साथ आहे.

डाॅ.मोरे दामप्त्य प्रत्येकाशी आपुलकीने प्रेमाने रुग्णांची विचारपूस करतात. रुग्णांचे अर्ध दुख: त्यांच्या मितभाषी स्वभामुळेच कमी होतात हे अनेकांनी अनुभवले आहे .

आरोग्य क्षेत्रात काम करताना रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानणारे सार्वजनिक जीवनात पारदर्शकता व चारित्र्य राखणारे तसेच वैद्यकीय क्षेत्रातील सहकाऱ्यांसोबत आठवड्यातील एक दिवस स्वत:च्या स्वास्थासाठी,वृक्षारोपणासाठी पर्यावरण संरक्षणासाठी, स्वच्छता अभियानासाठी ,अनाथ,वृद्धाश्रम सेवेसाठी साठी अनेक वर्षांपासून अव्याहतपणे सेवा देत आहेत.

डॉक्टर्स असोसिएशन मार्फत रामशेज किल्ला ट्रेकिंग तसेच अंजनेरीच्या कुशीत वृक्षारोपण, कैलास टेकडीवरील स्वच्छता अभियान असो किंवा हिमालय पर्वतावर १४००० फुटावर तिरंगा फडकवणे असो,बाईक राईड करत फिटनेसचा संदेश ते देत असतात.

पर्यावरण संरक्षणाचे कट्टर पुरस्कर्ते असून त्यांच्या विविध क्षेत्रांतील कार्याची दखल घेऊन आणि जीवनातील पैलूला प्राधान्य देऊन त्यांची या अवॉर्डसाठी निवड करण्यात आली.

वैद्यकीय क्षेत्रात महाराष्ट्रातून मिळणारा मानाचा हा भारतज्योती प्रतिभा सन्मान एक्सलन्स अवॉर्ड २०२४ राज्यस्तरीय पुरस्कार आहे, नाशिक विभागातून यंदा हा सन्मान मिळवणारे डाॅ.दत्तप्रसादजी मोरे हे पहिले व्यक्ती आहेत, हे विशेष

पुरस्काराचे स्वरूप आकर्षक सन्मानचिन्ह,लक्षवेधी गौरव पदक, विशेष महावस्त्र, खास मानपत्र, मानकरी बॅच आणि मानाचा फेटा असे असून नामवंत सिने अभिनेते तसेच पाहुण्यांच्या प्रमुख उपस्थित पुणे येथे पुरस्कार प्रदान करण्यात येईल.असे व्यंकटेश संस्था पुणे यांनी सुचित केले आहे.

सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेली विश्व राजभारती संस्था,महाराष्ट्र समिती मार्फत नाशिक विभागातुन यांचे नामांकन करण्यात आले होते.दरवर्षी ही संस्था समाजातील गुणिजनांचे कार्य कुशल ,आदर्श व्यक्तिमत्वांचे नामांकन करत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *