जामन्या-गाडऱ्या आदिवासी पाड्यांवरील अवैद्य दारू विक्री बंदीबाबत ग्रामसभा ठरावातुन पोलिसांकडे मागणी

जामन्या-गाडऱ्या आदिवासी पाड्यांवरील अवैद्य दारू विक्री बंदीबाबत ग्रामसभा ठरावातुन पोलिसांकडे मागणी


दक्ष जळगाव,  प्रतिनिधी, जुम्मा तडवी, रावेर

यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम क्षेत्रातील आदिवासी पाड्यांवर मोठ्या प्रमाणावर अवैद्य गावठी दारूची सर्रासपणे विक्री होत असुन सदरील खुलेआम विक्रीस दारूमुळे अनेक अल्पवयीन मुले दारू आर्कषणास बळी पडून व्यसनाच्या आहारी जावुन त्यांचे आयुष्य उद्धवस्त होवुन मृत्युमुखी पडत असल्याचा धक्कादायक प्रकार घडत आहे.पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क विभागाने याकडे तात्काळ लक्ष वेधुन संयुक्तपणे कार्यवाही करावी व अवैद्य दारूची होणारी विक्री कायमची बंद करावी अशी मागणी पद्य वस्त्यांवरील आदिवासी बांधवांकडून केली जात आहे.


या संदर्भात सातपुडा पर्वताच्या अतीदुर्गम क्षेत्रातील गाडऱ्या जामन्या,उसमळी,लंगडा आंबा या मध्यप्रदेश राज्याच्या सिमेवर लागुन असलेल्या गावपाड्यांवर गेल्या अनेक दिवसांपासुन सर्रासपणे विविध प्रकारची रसायनीक व हातभट्टीची गावठी दारूची मोठया प्रमाणावर सर्वत्र खुलेआम विक्री करण्यात येत असल्याने अनेक तरूण व अल्पवयीन मुल हे दारूच्या आहारी जावुन व्यसनाधीन होवून त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे आयुष्य उध्दवस्त होत आहे.याबाबत महिला वर्गाकडून सतत होणाऱ्या दारूबंदीच्या मागणीला गाडऱ्या जामन्या या ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच मोती जुगा बारेला यांनी महिलांच्या दारूबंदी संदर्भातील मागणीची दखल घेत गाडऱ्या जामन्या,उसमळी,लंगडा आंबा या गावातुन अवैद्य मार्गाने विक्रीस जाणाऱ्या दारूची विक्री बंद करावी असा ठराव ग्रामपंचायतव्दारे घेण्यात आलेल्या ग्रामसभेत घेतला असुन या संदर्भातील संबधीत दारू विक्रत्यांवर कार्यवाही करण्यात यावी असे पत्र यावलचे पोलीस निरिक्षक यांना देण्यात आले आहे.या निवेदनावर मोठया प्रमाणावर गाडऱ्या जामऱ्या ग्रामस्थांच्या स्वाक्षरी आहे.दरम्यान पोलीसांनी वाघझीरा या ठिकाणी केलेल्या दारूबंदीच्या कार्यवाहीचे स्वागत करण्यात येत असुन तरी देखील यावल तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या वतीने ग्रामसभेत ठराव करून सदरच्या अवैधरित्या विक्रीस जाणाऱ्या दारू बंद करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.पोलीस प्रशासनाने व उत्पादन शुल्क विभागाने या कार्यवाही देखील लक्ष देऊन या पाड्या वस्त्यांवरील अवैद्य गावठी दारू कायमची बंद करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *