‘बॉलिवूडमध्ये कधीच काम करणार नाही’ सर्वाधिक मानधन घेणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्याचा खुलासा.

 सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याने कधीच हिंदी सिनेमांमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या दाक्षिणात्य सुपरस्टार्स बॉलिवूडमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. मग ती लेडी सुपरस्टार नयनतारा असो वा रश्मिका मंदाना. पण भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता अल्लू अर्जुनने कधीही बॉलिवूड चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुनने त्याच्या ‘पुष्पा द रुल’ या आगामी सिनेमासाठी ३०० कोटी रुपयांचं मानधन घेतलं असतं.

५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘पुष्पा २’ च्या प्रमोशन दरम्यान, अभिनेत्याने सांगितलं की, तो कधी हिंदी सिनेसृष्टीत येणार नाही. पत्रकार परिषदेत, अभिनेत्याने संगीत दिग्दर्शक देवी श्री प्रसाद यांची भेट घेतलेली. त्यांच्यासोबत झालेल्या संवादाची आठवण करून देत अल्लू अर्जुनने सांगितलं की, आम्हाला दोघांनाही वाटतं हिंदी सिनेमांमध्ये काम करणं आव्हानात्मक आहे. अल्लू अर्जुनने खुलासा केला की, दिग्दर्शक सुकुमार यांनी त्याला नॅशनल फिल्म बनवण्याचं वचन दिलं होतं. अल्लू अर्जुन म्हणाला की, ‘हे सर्वात खास आहे कारण गेल्या वर्षात ६९ वर्षात कोणत्याही तेलगू अभिनेत्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला नाही. ही माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे. सुकुमार गरू या एका माणसामुळेच हे शक्य झालंय.’ अल्लू अर्जुन म्हणाला की, ‘मी त्यांना विचारलं की, तुम्ही बॉलिवूडमध्ये काम का नाही केलं. त्यावर त्यांनी काही उत्तर दिलं नाही आणि मलाच विचारलं की, तू का हिंदी सिनेमांमध्ये काम करत नाहीस. मी म्हणालो, मी कधीच हिंदी सिनेमांमध्ये काम करणार नाही. कारण, त्यावेळी इंडस्ट्री येणं खूप कठीण होतं. मात्र, भविष्यात त्याने एक-दोन हिंदी सिनेमे करावे अशी त्यांची अपेक्षा आहे.’ दरम्यान, अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ सिनेमाबद्दल बोलायचं तर या सिनेमामध्ये अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदाना आणि फहद फासिल देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘पुष्पा : द राइज’च्या यशानंतर चाहते त्याच्या सीक्वलची आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होणार म्हटल्यावर प्रेक्षक अधिकच उत्सुक झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *