जो रुटची ऐतिहीसिक कामगिरी; कसोटी क्रिकेटमध्ये हाहाकार माजवला.

जो रूट गेल्या काही काळापासून चमकदार कामगिरी करत आहे आणि दिवसेंदिवस अधिक चांगले होत आहे. सध्या तो जगातील अशा काही क्रिकेटपटूंपैकी एक आहे ज्यांनी प्रत्येक मैदानावर आपल्या फलंदाजीने आपली छाप सोडली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तो मोठी खेळी खेळण्यात यशस्वी ठरला नसला तरीही त्याने सचिन तेंडुलकरचा एक मोठा विक्रम मोडला आहे. जो रूट गेल्या काही काळापासून चमकदार कामगिरी करत आहे आणि दिवसेंदिवस अधिक चांगले होत आहे. सध्या तो जगातील अशा काही क्रिकेटपटूंपैकी एक आहे ज्यांनी प्रत्येक मैदानावर आपल्या फलंदाजीने आपली छाप सोडली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तो मोठी खेळी खेळण्यात यशस्वी ठरला नसला तरीही त्याने सचिन तेंडुलकरचा एक मोठा विक्रम मोडला आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या डावात जो रूटला आपले खातेही उघडता आले नव्हते. आता दुसऱ्या डावात त्याने नाबाद २५ धावा केल्या, जो सामन्यातील चौथा डाव होता. यासह तो कसोटी क्रिकेटच्या चौथ्या डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. जो रूटने कसोटीच्या चौथ्या डावात आतापर्यंत एकूण १६३०धावा केल्या आहेत. सचिनच्या नावावर १६२५ धावा आहेत. जो रूटने २०१२ मध्ये इंग्लंडकडून कसोटी पदार्पण केले होते. यानंतर तो इंग्लंडच्या फलंदाजीच्या क्रमातील महत्त्वाचा दुवा बनला. आतापर्यंत त्याने १५० कसोटी सामन्यांमध्ये एकूण १२७७७ धावा केल्या आहेत ज्यात ३५ शतके आणि ६४ अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा तो पाचव्या क्रमांकावर आहे. एकदा तो क्रीजवर स्थिरावला की त्याला बाद करणे कठीण होऊन बसते. न्यूझीलंडने इंग्लंडला विजयासाठी १०४ धावांचे लक्ष्य दिले, जे इंग्लिश संघाने अगदी सहज गाठले. या कसोटी सामन्यात हॅरी ब्रूकने इंग्लंडकडून १७१ धावांची दमदार खेळी केली. याशिवाय, ओली पोपने गोलंदाजीचे उत्कृष्ट उदाहरण सादर केले. ब्रेडन कार्सने १० विकेट घेत सामना इंग्लंडच्या दिशेने वळवला. हा सामना जिंकून इंग्लंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *