संजय राऊत संतापले, मारकडवाडीत बॅलेट पेपरवर मतदानास प्रशासनाचा विरोध.

 सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडी गावातील ग्रामस्थांनी फेरमतदान करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांच्या मते विजयी उमेदवार उत्तम जानकर यांना अपेक्षित मते मिळाली नाहीत. प्रशासनाने कलम १४४ लागू केले असून, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यभरात सोलापूर जिल्ह्यमधील माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडी ग्रामस्थांनी फेरमतदान करण्याचा निर्णय घेतला. मारकडवाडीमध्ये शरद पवार गटाचे विजयी उमेदवार उत्तम जानकर यांना अपेक्षित मते न मिळाल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचं ग्रामस्थांनी ठरवलं आहे. राज्यात निकाल लागून अद्यापही सरकार स्थापन झाले नसताना ग्रामस्थांनी पुन्हा एकदा मतदान करण्याचा निर्णय घेतला. मात्र याला प्रशासनाचा विरोध असून कलम १४४ लागू केलं आहे. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मारकडवाडी गावामध्ये १४४ कलम लावलं गेलं आहे. लोकशाही मार्गाने मतदान घेऊ इच्छिणाऱ्या लोकांना घरातून बाहेर पडू नका अशा धमक्या दिल्या जात आहेत. राज्यामध्ये यांचं सरकार यायचंय, माळशिरसमध्ये भाजपचा पराभव झाला आहे. पण लोकांना वाटत आहे की विजयी उमेदवाराला मिळालेली मते कमी आहेत. हा महत्त्वाचा विषय असून जिंकूनसुद्धा ते मतदान घेत आहे. ही मतदानप्रक्रिया बेकायदेशीर नाही, आम्हाला अधिकार असून निवडणूक आयोगाला निवडणूक घ्यायला लावत आहोत का? आमच्या समाधानासाठी गावात नक्की काय झालं हे आम्ही ठरवत आहोत. ज्याला मतदान होऊ नये अशी आमची भूमिक होती जर त्या उमेदवाराला मतदान झालं असेल तर गावाने मॉक पोल घेण्याचं ठरवल्याचं असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

माळशिरसमधील मारकडवाडीमध्ये लोकांनी ठरवलं आपण बॅलेटवर मतदान करून आपल्या गावचा कौल काय आहे ते निवडणूक आयोगाला दाखवायचंय. अशा परिस्थितीत मिळालेल्या बहुमतावर सरकार स्थापन करायला निघालेत त्यांचा विश्वास बसत नाहीये आणि तेही गोंधळलेले आहेत. राज्यपालांकडे अजून सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. दहा दिवसांनंतर बहुमत असलेला पक्ष राज्यपालांकडे जाऊन दावा करत नाहीत. आपल्या पाठीमागे किती आमदार आहेत याची यादी देत नाहीत. राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी अजून निमंत्रण दिले नाही. इकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष शपधविधीची तारीख जाहीर करतात आणि आझाद मैदानावर शपथविधीची तयारी सुरू होते. मंडप घातला जातो, कार्पेट टाकला जातो हा काय प्रकार आहे असा सवाल संजय राऊत यांनी केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *