जळगाव मध्ये महायुतीचे उमेदवार यांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी मनसेचा निर्धार मेळावा.

जळगाव मध्ये महायुतीचे उमेदवार यांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी मनसेचा निर्धार मेळावा.

महत्वाचे.. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार ॲड. जयप्रकाश बाविस्कर व जळगाव रावेर लोकसभेचे समन्वयक पक्षाचे नेते अभिजीत पानसे  (ठाणे) यांच्या अध्यक्षतेखाली जळगांव जिल्ह्यातील पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीला सर्व जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, महानगर अध्यक्ष, शहराध्यक्ष, जिल्हा परिषद गट अध्यक्ष, पंचायत समिती गण अध्यक्ष, विभाग अध्यक्ष, महिला पदाधिकारी व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती.

बैठक अतिशय महत्त्वाची असून कोणीही गैरहजर राहू नये.

बैठकीचे ठिकाण – व.वा. वाचनालय , रेल्वे स्टेशन जवळ, हॉटेल सिल्वर पॅलेस च्या मागे जळगाव. बैठक दिनांक.- २ मे २०२४ बैठकीची वेळ- संध्याकाळी ५ वाजता

टीप- बैठकी नंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

आपला नम्र ॲड.जमील देशपांडे जिल्हाध्यक्ष- जळगांव

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *