बाळासाहेबांनी ज्या दगडाला शेंदूर फासला त्या सरवणकरांचा माज उतरवायचा होता.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले उद्धव ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांनी सदा सरवणकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावेळी महेश सावंत यांनी सदा सरवणकर यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. मनामध्ये एक इच्छा होती की, बाळासाहेबांनी ज्या दगडाला शेंदूर फासलेला होता, सदा सरवणकर हे गेले तीस वर्ष राजकारणात आहेत त्यांना पाणी पाजायच होतं आणि त्यांचा माज उतरावयाचा होता, असं म्हणत त्यांनी सदा सरवणकर यांच्यावर टीका केली.

मी त्यांच्या मुलाच्या विरोधात देखील लढलो होतो. त्यावेळी मी पावणे दोनशे मतांनी मी पडलो होती. त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती, मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती आणि तो हिशेब शिल्लक होता. त्यांनी दोन वर्षांपूर्वी गणपतीला माझ्यावर फायरिंग देखील केलेली होती. मी भाग्यवान समजतो की प्रतिस्पर्धी समोर आल्यानंतर सुद्धा मी लढलो. मी बाळासाहेब ठाकरे यांना वचन दिले होते की माहीममध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये भगवा फडकवणार आणि मी त्या दिवसाची वाट पाहत होतो.सदा सरवणकर यांना गद्दारीचा शाप होता. तो शाप शिवसैनिकांनी पुसून टाकला. माहीममध्ये सगळ्या जाती धर्माची देवस्थानं आहेत. गद्दारीचा शाप माहीमवर लागला होता. तो आम्ही शिवसैनिकांनी आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मिळून पुसून टाकला आहे. राज ठाकरेंचं आव्हान आम्ही विचारातही घेतलं नव्हतं.माहीम विधानसभा मतदारसंघांमध्ये शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा कडवा सामना या मतदारसंघांमध्ये पाहायला मिळाला होता या मतदारसंघांमध्ये गेली तीस वर्ष सदा सरवणकर हे राजकारण करतायेत. याच मतदारसंघांमध्ये सदा सरवणकर यांना पराभव पत्करावा लागत आहे. त्याचप्रमाणे या मतदारसंघामध्ये विशेष म्हणजे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते. मात्र, या निवडणुकीमध्ये अमित ठाकरे यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्यानंतर या मतदारसंघांमध्ये मतदानाचे विभाजन झाले आणि याचा फायदा ठाकरे गटाच्या उमेदवाराला झाला आहे. या मतदारसंघांमध्ये महेश सावंत हे तेराशेच्या मताधिक्याने निवडून आले असून राज ठाकरे आणि सदा सरवणकर यांना मोठा फटका बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *