ती माझ्या लेकाची यशोदाच, त्यांच्याशिवाय मी… मराठी अभिनेत्रीनं केलं सासूबाईंचं कौतुक.

हाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील सर्व कलाकार घराघऱात लोकप्रिय झाले आहेत. या कलाकारांमध्ये नम्रता संभेराव हिचा देखील समावेश आहे. टीव्ही शोचं शूटिंग, चित्रपटाचं शूटिंग, नाटकाचे प्रयोग अशी कलाकारांची एकाचवेळी कसरत सुरू असते. अभिनेत्री नम्रता आवटे-संभेरावचंच घ्या. गेल्या काही वर्षात तिनं या तिनही क्षेत्रात काम केलंय. टीव्ही शो आणि चित्रपट अशा ठिकाणी तिची धावपळ सुरू आहे. या क्षेत्रात करिअर करताना महत्त्वाचा असतो तो म्हणजे कुटुंबियांचा पाठिंबा. याबद्दल ती नेहमीच बोलताना दिसते. आता तिनं तिच्या सासूबाईंचं विशेष कौतुक केलं आहे.माझ्या सासूमुळं मी बिनधास्तपणे या क्षेत्रात काम करू शकते, असं नम्रता सांगते. ‘मी माझ्या सासूशिवाय खरं तर काहीच करू शकत नाही. सासूमुळेच माझं काम सुरळीत होतंय, सगळं कसं व्यवस्थित सुरू आहे. आपल्याला दोन पायांवर व्यवस्थित चालता येतं. एखाद्या पायाला दुखापत झाली तरी चालणं कठीण होतं, तर माझी सासू माझा एक पाय आहे. त्यामुळं मी माझ्या करिअरमध्ये काम करू शकतेय. कारण माझा मुलगा पूर्णवेळ त्यांच्यासोबत असतो.मला त्याला वेळ देणं शक्य नसतं, त्यामुळं तो त्यांच्याकडेच असतो, रुद्राजसाठी त्या यशोदाच आहेत, असंही नम्रता म्हणाली. ‘तारांगण’ या युट्यूब चॅनेल सोबत ती बोलत होती.

दरम्यान, एका मुलाखतीत नम्रतानं तिच्या गरदोरपणातील अनुभव शेअर केला होता.आयुष्यात असाही काळ आलाय जेव्हा मी खूप रडले. मी आणि योगेश लग्नानंतर तब्बल सहा वर्षे बाळासाठी प्रयत्न करत होतो पण प्रत्येकवेळी अपयश येत होतं. हास्यजत्रा सुरू झाली आणि दुसऱ्याचं एपिसोडला कळलं की मी प्रेग्नन्ट आहे. या काळात मला ‘तेव्हा सर, प्रसाद, समीर दादा, गोस्वामी सर यांनी मला खूप सपोर्ट केला. जेवढं जमेल तेवढं काम करायचं ठरलं. त्यामुळं तो आनंद वेगळा होता. मी सात महिने पूर्ण होईपर्यंत काम केलं.
बाळाच्या जन्मानंतर मी सहा महिन्यानी मी पुन्हा सेटवर परत गेले. मात्र तेव्हा मला खूप डिप्रेशन आलेलं. वजन वाढलेलं, चेहरा सुजलेला, आत्मविश्वास गेलेला. तो काळ खरंच कठीण होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *