सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २: द रुल’ सिनेमा रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. पण पहिल्या सोमवारी मात्र सिनेमाच्या कमाईत घट झाल्याचं दिसून आलं. वर्षाच्या शेवटी यंदाचा बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक असलेला ‘पुष्पा २: द रूल’ प्रदर्शित झाला. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या सिनेमा ५०० कोटींच्या वर कमाई केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सिनेमाची चर्चा सुरू होती. त्यामुळं जोरदार ओपनिंगसह पुष्पा २नं अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत. पण कोणत्याही सिनेमाची खरी परीक्षा ही पहिल्या सोमवारी असते.
पुष्पा २ हा गुरुवारी प्रदर्शित झाला, त्यामुळं चार दिवसांचा मोठी वीकेंड सिनेमाला मिळाला. पहिल्या चार दिवसात कोट्यवधींची कमाई केल्यानंतर सिनेमा सोमवारी किती कोटींची कमाई करणार?याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पण सोमवारी सिनेमाच्या कमाईत मोठी घट झाल्याचं दिसून आलं. रविवार पर्यंत सिनेमानं बजेट वसूल केलं असलं तरी सोमवारी मात्र सिनेमाला तिच जादू कायम ठेवता आली नाहीये. ५०० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या पुष्पा २नं अनेक सिनेमांचे रेकार्ड्स मोडले. पण सोमवारी सिनेमाच्या कमाईत मोठी घसरण झाली. सोमवारी सगळ्यात जास्त कमाईचा रेकॉर्ड पुष्पा २ मोडणार, अशा चर्चा सुरू होत्या, पण तसंच होऊ शकलं नाही.