डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विद्यापीठ संशोधनात अग्रेसर.

​​तीसपेक्षा अधिक पेटंट आहेत; तर काही कॉपीराइटही आहेत. काही प्राध्यापकांनी दोन किंवा त्यापेक्षा अधिक संशोधनात पेटंट मिळवित संशोधनात आपल्यासह विद्यापीठाचे नाव केले. तर पर्यावरण, गणित, सांख्यिकीसारख्या विषयांमधील संशोधनाने राज्य, राष्ट्रीय पातळीवर आपला दबदबा कायम ठेवला आहे. काही प्राध्यापकांना दोन किंवा त्यापेक्षा अधिक संशोधनात पेटंट मिळविले आहे. यात केंद्र सरकारसह ऑस्ट्रेलियन, दक्षिण अफ्रिका देशातील पेटंट आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उच्च शिक्षणासह संशोधनावरही भर देत आहे. कृषी, वैद्यकीय जैवविविधता, अन्नतंत्रज्ञान ते माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विषयात विद्यापीठातील अनेक प्राध्यापक संशोधनात मौलिक भर घालत आहेत. पाच वर्षात तीसपेक्षा अधिक संशोधनासाठी पेटंट, कॉपीराइट विद्यापीठाकडे आहेत त्यात आनखी नवनवीन संशोधनाची भर पडते आहे. त्यामुळे विद्यापीठाचा नावलौकीक वाढण्यास मदत झाली आहे.

संशोधनाला चालना मिळावी, या हेतुने विद्यापीठ प्रशासन विविध पातळीवर प्रयत्न करते. संशोधकांच्या लघू, मोठ्या प्रकल्पांना निधीही दिला जातो. काही वर्षांत विद्यापीठातील अनेक प्राध्यापक संशोधकांनी आपल्या संशोधनातून विद्यापीठाचा नावलौकिक वाढवला आहे. यामध्ये अन्नप्रक्रियेपासून नॅनो मटेरियल, औषधी वनस्पतींचे जतन, संवर्धन कीटकनाशकावर संशोधन, बिद्री माती संवर्धन, जैवविवधता टिकविण्याच्या दृष्टिकोनातून पॉल हबर्ट डीएनए बारकोडिंग सेंटर करत असलेले संशोधन यासह कृषी, आरोग्यासह विविध क्षेत्रातील संशोधनासाठी अनेक प्राध्यापकांनी पेटंट ही मिळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *