‘कोणत्याही कर्मचारी, अधिकारी यांची सेवा, आस्थापनाविषयक आणि नागरिकांची कामे जिल्हा परिषदेच्या पातळीवर होणार असली तरीही त्यासाठी अनेक जण मंत्रालयात येतात. त्यांनी त्या कामांसाठी मंत्रालयात येऊ नये. त्यांची कामे जिल्हा परिषेदच्या पातळीवरच पूर्ण करावी,’ अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना केल्याचे गोरे यांनी सांगितले.‘घरकुल मंजूर करणे, घरकुलाचा हप्ता देण्यासाठी कर्मचारी, अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे पैसे देण्याची गरज नाही. […]