महिलांना दरमहा २५०० रुपये, होळी-दिवाळीत मोफत सिलेंडर, दिल्लीत भाजपकडून ‘रेवड्यां’ची बरसात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेच्याविरुध्द भाजपने अनेक ‘रेवड्या’ वाटण्याचे आश्वासन दिले आहे. आम्ही दिल्लीत केजरीवालच्या सर्व योजना सुरू ठेवू, असे भाजप म्हणतो. म्हणजे केजरीवाल सर्व कामे चांगल्या प्रकारे करतील तर मग कोणी भाजपला मतदान का करावे?’ असा सवाल केजरीवाल यांनी विचारला.‘राजधानीतील मुख्य विरोधी पक्षाचे हे संकल्प पत्र म्हणजे आम आदमी पक्षाची (आप) नक्कल आहे. हे भाजपचे संकल्प पत्र नाही तर ‘केजरीवाल पत्र’ आहे,’ अशा शब्दांत आपचे मुख्य संयेाजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ‘भाजपची ही खोटी मोफत आश्वासने माझ्या दिल्लीची जनता स्वीकारणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेच्याविरुध्द भाजपने अनेक ‘रेवड्या’ वाटण्याचे आश्वासन दिले आहे. आम्ही दिल्लीत केजरीवालच्या सर्व योजना सुरू ठेवू, असे भाजप म्हणतो. म्हणजे केजरीवाल सर्व कामे चांगल्या प्रकारे करतील तर मग कोणी भाजपला मतदान का करावे?’ असा सवाल केजरीवाल यांनी विचारला.

भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी संकल्प पत्र-१ हा आपला जाहीरनामा प्रकाशित केला त्यात महिलांना केंद्रस्थानी ठेवून आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. महिला समृद्धी योजने अंतर्गत महिलांना प्रत्येकी मासिक २,५०० रुपये आणि गर्भवती महिलांना २१,००० रुपयांची आर्थिक मदत यासह दिल्लीच्या ज्येष्ठ नागरिकांना ५०० रुपयांना गॅस सिलिंडर आणि २५०० रुपये पेन्शन देण्याची आश्वासनेही आहेत.भाजप दिल्लीत सत्तेत आला तर अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या सर्व `कल्याणकारी` योजना अधिक प्रभावीपणे सुरूच ठेवू असे भाजपने आवर्जून सांगितले आहे. पंडित पंत मार्गावरील राज्य भाजप कार्यालयात संकल्प पत्र-१ चे प्रकाशन करताना पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा म्हणाले की, हा जाहीरनामा ‘विकसित दिल्ली’चा पाया रचणारा ठरेल. भाजपने आज त्यांच्या जाहीरनाम्याचा पहिला भाग प्रसिद्ध केला आहे आणि दुसरा आणि तिसरा भाग देखील लवकरच प्रसिद्ध केला जाईल.भाजप सरकारद्वारे सार्वजनिक कल्याणकारी योजनांमध्ये भ्रष्टाचाराच्या सर्व आरोपांची चौकशी केली जाईल असा इशारा नड्डा यांनी दिला. ते म्हणाले की आयुष्मान भारत योजनेअंतर्गत, दिल्लीतील पात्र लाभार्थींना ५ लाख रुपयांचे अतिरिक्त आरोग्य कवचही दिले जाईल.

आप सरकारच्या मोहल्ला क्लिनिकला ‘भ्रष्टाचाराचा अड्डा’ आणि जनतेच्या डोळ्यात ‘धूळ फेकण्याचा’ कार्यक्रम अशी टीका करताना नड्डा यांनी असाही दावा केला की मोहल्ला क्लिनिकमध्ये बनावट लॅब चाचण्या घेण्यात आल्या आहेत आणि ३०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. भाजप सत्तेत आल्यास राजधानीतील झोपडपट्ट्यांमध्ये गरिबांना फक्त पाच रुपयांत पूर्ण जेवण देणारी अटल उपहारगृह योजना सुरू करण्याचे आश्वासनही नड्डा यांनी दिले. ते म्हणाले की २०१५ मध्ये ‘आप’ने १०० ठिकाणी ‘आम आदमी कॅन्टीन’ चालवण्याचा निर्णय घेतला होता ज्याची दिल्लीतील गरीब जनता आजपर्यंत वाट पाहत आहे. दिल्लीत भाजप सरकार स्थापन झाले तर राजधानीतील गरीब लोकांना सिलेंडरवर ५०० रुपयांचे अनुदान दिले जाईल आणि होळी आणि दिवाळीला त्यांना एकेक सिलेंडर मोफत दिला जाईल.राजधानीतील मुख्य विरोधी पक्षाचे हे संकल्प पत्र म्हणजे ‘आप’ची नक्कल केली आहे. हे भाजपचे संकल्प पत्र नाही तर ‘केजरीवाल पत्र’ आहे. भाजपची ही खोटी मोफत आश्वासने माझ्या दिल्लीची जनता स्वीकारणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेच्या विरुद्ध भाजपने अनेक ‘रेवड्या’ केल्या आहेत. आम्ही दिल्लीत केजरीवालच्या सर्व योजना सुरू ठेवू असे भाजप म्हणतो. म्हणजे केजरीवाल सर्व कामे चांगल्या प्रकारे करतील तर मग कोणी भाजपला मतदान का करावे’आप’चे आमदार ऋतुराज झा यांच्या आडनावावरून केलेल्या अशोभनीय टिप्पणीबाबत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी शुक्रवारी हात जोडून जाहीर माफी मागितली. पूनावाला म्हणाले, ‘मी माझ्या सर्व पूर्वांचल बंधू आणि भगिनींची हात जोडून माफी मागतो. माझ्या शब्दांनी ते दुखावले गेले आहेत. मला याबाबत कोणतेही स्पष्टीकरण द्यायचे नाही.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *