चीनच्या लोकसंख्येत सलग तिसऱ्या वर्षी घट कायम; कामगारांची कमतरता, ज्येष्ठ वाढले

सन २०२३च्या तुलनेत चीनची लोकसंख्या सुमारे १४ लाखांनी घटून सुमारे १.४१ अब्जांवर पोचली आहे, असे एका सरकारी अहवालात नमूद करण्यात आले आहे.चीनच्या लोकसंख्येत तीन वर्षांपासून सुरू असलेली घट गेल्या वर्षीही (सन २०२४) कायम आहे. सन २०२३च्या तुलनेत चीनची लोकसंख्या सुमारे १४ लाखांनी घटून सुमारे १.४१ अब्जांवर पोचली आहे, असे एका सरकारी अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे चीनमध्ये कामकरी वर्गाची कमतरता भासत असून, दीर्घ आयुर्मानामुळे ज्येष्ठांची संख्या मात्र वाढते आहे.पूर्व आशियात लोकसंख्येत घट होण्याचा कल दिसून येत आहे. जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग यांसह अनेक देशात जन्मदर कमालीचा घटला आहे. चीन सरकारने जाहीर केलेली आकडेवारी या कलाशी सुसंगत आहे.

तीन वर्षांपूर्वी चीन लोकसंख्येत घट होत असलेल्या जपान आणि पूर्व युरोपीय देशांच्या पंगतीत जाऊन बसला.निरनिराळी संकटे येऊनदेखील कित्येक वर्षे चीन जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या देशांपैकी एक आहे. स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाणही चीनमध्ये अधिक आहे. या प्रकाराला पायबंद घालण्यासाठी सरकार प्रयत्नशील असले, तरीही गर्भपाताला कायदेशीर मान्यता असणे आणि बेकायदा सोनोग्राफी यंत्रांचा सुळसुळाट यामुळे चीनमध्ये स्त्री भ्रूणहत्या मोठ्या प्रमाणावर होते. शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार चीनमध्ये स्त्री-पुरुष गुणोत्तर १०० : १०४.३४ असे आहे. याच जोडीने जन्मदरातही घट होत आहे. सन २०२३पासून चीनची लोकसंख्या घटण्यास सुरुवात झाली. त्याच वर्षी भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *