धरणगाव विकास मंच तर्फे शहरातील समस्यांचा निपटारा होण्यासाठी नगरपरिषदेला तिसऱ्यांदा निवेदन..

धरणगाव विकास मंच तर्फे शहरातील समस्यांचा निपटारा होण्यासाठी नगरपरिषदेला तिसऱ्यांदा निवेदन..

धरणगाव तालुका प्रतिनिधी – राजु बाविस्कर

धरणगाव : येथील धरणगाव विकास मंचच्या वतीने शहरातील असंख्य विविध समस्यांचे निवारण तातडीने करावे, याबाबतीत धरणगाव नगरपरिषदेचे पाणी पुरवठा अधिकारी सौ.अनुराधा चव्हाण यांना आज (दि.९) रोजी निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात.. १ छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांना मोकळा श्वास मिळेल अशी व्यवस्था करावी. २ गावातील तुडुंब भरलेल्या गटारी स्वच्छता करणे. ३ बंद असलेले स्ट्रीट लाईट व हायमास्ट लॅम्प सुरू करणे. ४ धरणी नाल्याची साफसफाई करणे. ५ बालाजी मंदिर जवळील झोपडपट्टी भागातील सार्वजनिक स्वच्छता गृहांचा मैला गटारातून वाहतो, त्याचे योग्य नियोजन करणे. ६ सार्वजनिक विहिरीची स्वच्छता करून त्यांना पुनर्जिवित करणे. ७ शहरातील टिळक तलाव (बेबी तलाव) जलपर्णीने पूर्ण भरलेला असून जलपर्णी आणि तलावातील गाळ काढण्यात यावा. ८ तेली तलावात येणाऱ्या कॉलनी भागातील अशुद्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे. ९ ठिकठिकाणी तुटलेल्या ढाप्यांची दुरुस्ती करणे. १० शहरातील मुख्य रस्त्यावर आणि दुकानांसमोर वाहने लावल्यामुळे सतत रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याने रहदारी सुरळीत करणे. ११ गावातील कोणत्या प्रभागात नळांना पाणी पुरवठा नेमके कधी करण्यात येईल, याबाबतची माहिती विकास मंच गृपला द्यावी, जेणेकरून नागरिकांना माहिती देण्यात येईल. १२ पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे लिकेज बंद करणे. १३ संपूर्ण गावात मच्छर आणि डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी करावी. १४ धरणी नाल्यावरील पुलाच्या तुटलेला कठडा बसविणे. १५ कॉलनी वासियांना नव्याने नळ कनेक्शन देणे. १६ सर्व स्मशानभूमीत स्वच्छता करणे. आदींसह शाश्वत समस्यांचे निवारण होण्यासाठी निवेदन देण्यात आले.

आजच्या निवेदनात दिलेल्या समस्यांची उकल त्वरीत करण्यात यावी अशी विनंती गणेशसिंह सूर्यवंशी यांनी केली. जीवनावश्यक गोष्टी नगर परिषदेने प्राध्यान्यक्रमाने पुरवाव्यात एवढी माफक अपेक्षा नागरिकांची असते, असे मत मंगलदास भाटिया यांनी मांडले. नगरपरिषदेला दिलेल्या निवेदनात वरील समस्यांचे तातडीने निवारण करावे, अशी अपेक्षा धरणगाव विकास मंचचे सूरज वाघरे यांनी केले. यावेळी राहुल जैन, लक्ष्मणराव पाटील, सुधाकर विसावे, मंगलदास भाटिया, गणेशसिंह सूर्यवंशी, गोरखनाथ देशमुख, प्रफुल पवार, एजाज खान, दिपक पाटील, महेंद्र तायडे, योगेश पाटील, सूरज वाघरे, अरुण विसावे, मयूर भामरे, राजेंद्र वाघ यांसह नगरपरिषदेचे अनिल पाटील, निलेश वाणी, नारायण माळी, सिकंदर पवार, युवराज चौधरी, रविंद्र वाघमारे आणि शहरातील सजग नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *