दिल्ली सरकारच्या मंत्र्यांमध्ये विभागांची विभागणी, कोणाच्या खांद्यावर कोणती जबाबदारी?

दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान विजयाकरिता भाजपने जनतेला अनेक मोठी आश्वासने दिली होती. त्यानुसार नवीन सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यापैकी दोन आश्वासनांना हिरवा कंदील मिळाला आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या की, आयुष्मान भारत योजनेच्या अंमलबजावणीला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. याशिवाय, मंत्रिमंडळाने विधानसभेच्या पहिल्या सत्रात १४ प्रलंबित कॅग अहवाल सादर करण्याचा निर्णय घेतला.काल (२० फेब्रुवारी) राजधानी दिल्लीत मुख्यमंत्री आणि आणि त्यांच्या मंत्र्यांचा रामलीला मैदानावर शपथविधी पार पडला. तब्बल २६ वर्षांनी दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपच्या रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

त्याचबरोबर, दिल्ली सरकारच्या मंत्र्यांमध्ये विभागांची विभागणी देखील करण्यात आली आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सामान्य प्रशासन, सेवा, वित्त, महसूल, महिला आणि बाल कल्याण, जमीन आणि इमारत, जनसंपर्क, दक्षता आणि प्रशासकीय सुधारणा ही खाती स्वतःकडे ठेवली आहेत. तर इतर सहा मंत्र्यांना रस्ते, आरोग्य, पाणी, गृह यासह महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी वित्त खाते स्वतःकडे ठेवले आहे. त्यामुळे दिल्लीच्या नवीन सरकारचा पहिला अर्थसंकल्प विधानसभेत त्याच सादर करतील. मागील वर्षांपर्यंत दिल्लीचे बजेट सरप्लस असायचे, परंतु सध्याची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. भाजपने दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असेल. दिल्लीतील विकासकामांना पुढे नेण्यासाठी भांडवली खर्च वाढवावा लागेल. जो, विविध योजनांसाठी अनुदान आणि महिलांना दरमहा २५०० रुपयांची आर्थिक मदत दिल्यानंतर पुरेसा पडणार नाही.अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणारे परवेश साहिब सिंग वर्मा यांच्याकडे जल विभागाची जबाबदारी असणार आहे. यमुना स्वच्छ करण्याचे तसेच संपूर्ण दिल्लीला पिण्याचे पाणी पुरवण्याचे आव्हानात्मक काम फक्त प्रवेश वर्मा यांच्यावर असेल. नवीन सरकार सत्तेवर येण्यापूर्वीच, यमुना नदीच्या स्वच्छतेचे काम सुरू झाल्याचे चित्र दिसून आले.दिल्लीतील वायू प्रदूषणाची समस्या ही सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक आहे. विशेषतः हिवाळ्याच्या काळात, देशाच्या राजधानीची हवा श्वास घेण्यास योग्य नसते. मनजिंदर सिंग सिरसा हे नवे पर्यावरण मंत्री असतील. दिल्लीची हवा स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असेल. अलीकडेच, सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला वायू प्रदूषण कमी न केल्याबद्दल कडक शब्दांत फटकारले होते.

अनेक प्रयोग करूनही, मागील सरकार दिल्लीतील हवा स्वच्छ करण्यात यशस्वी झाले नाही. त्यामुळे प्रदूषण कसे दूर करायचे हे ठरवण्याची मोठी जबाबदारी मनजिंदर सिंग सिरसा यांच्यावर असेल.डॉ. पंकज सिंह हे दिल्लीचे नवे परिवहन मंत्री असतील. येत्या काळात सार्वजनिक वाहतूक सुधारण्याची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असेल. दिल्लीतील सार्वजनिक वाहतुकीची स्थिती खूपच वाईट आहे. बसेस खरेदी करण्यापासून ते त्यांच्या कामकाजापर्यंत अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. दिल्लीत इलेक्ट्रिक बसेस धावताहेत. परंतु त्यांची संख्या इतकीही नाही की दिल्लीच्या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण गरजा पूर्ण करू शकतील.दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल सरकारच्या घोटाळ्यांचा मुद्दा गाजत राहिला. उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याबरोबरच, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या बांधकामात अनियमिततेच्या तक्रारीही सातत्याने समोर येत होत्या. या सर्व प्रकरणांच्या चौकशीची जबाबदारी दक्षता विभागाची आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दक्षता विभाग स्वतःकडे ठेवला आहे. आणि त्यामुळे येत्या काळात, मागील सरकारच्या कामकाजावर जी काही चौकशी होईल त्याचे निरीक्षण मुख्यमंत्री स्वतः करतील.दिल्लीच्या नवीन मंत्रिमंडळाने केंद्र सरकारची आयुष्मान योजना योजना पहिल्याच दिवशी दिल्लीत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे नवे आरोग्यमंत्री डॉ. पंकज सिंह यांच्यावर दिल्लीतील आरोग्य सेवा सुधारण्याची जबाबदारी असेल. शिक्षणाच्या पातळीवर बदल घडवून आणण्यासाठी आणि विशेषतः शालेय शिक्षण सुधारण्यासाठी नवीन शिक्षणमंत्री आशिष सूद यांच्यावर खूप दबाव असेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *