५ कोटी लोकांना २०२९पर्यंत हक्काचं घर; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मोठी घोषणा.

 देशातील पाच कोटी नागरिकांना २०२९ पर्यंत घरे देण्याचा संकल्प केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केला आहे, अशी माहिती केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी शनिवारी दिली.‘सर्वांसाठी घरे’ या अंतर्गत गरीब, गरजू, महिला, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (एससी, एसटी) या घटकांतील देशातील पाच कोटी नागरिकांना २०२९ पर्यंत घरे देण्याचा संकल्प केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केला आहे,’ अशी माहिती केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी शनिवारी दिली.पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) टप्पा दोन अंतर्गत राज्यातील २० लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप आणि दहा लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण कार्यक्रमात शहा बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे आदी या वेळी उपस्थित होते.शहा म्हणाले, ‘घर नसलेल्यांना हक्काचे घर, घरातच शौचालय, मोफत वीज, उज्ज्वला योजनेंतर्गत सिलिंडर देण्याचे काम केंद्र आणि राज्य सरकार करीत आहे. सन २०४७ पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट आहे. त्यामध्ये प्रत्येकाला घर, पाच लाखांपर्यंतचा विमा, पाच किलो धान्य मोफत, वीज आणि सिलिंडर देणे ही विकसित भारताची व्याख्या आहे. महिला, गरीब, एससी, एसटी या घटकांतील देशातील पाच कोटी नागरिकांना सन २०२९ पर्यंत घरे देण्याचा संकल्प मोदी सरकारने केला आहे. गेल्या ११ वर्षांत मोदी सरकारने चार कोटी लोकांना वीज, १३ कोटी शौचालये, एक कोटी लखपती दीदी आणि ३६ कोटी लोकांना गरिबीतून वर आणण्याचे काम केले आहे.’‘देशाला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा काम करीत आहेत. गेल्या अडीच वर्षांत पंतप्रधान मोदींनी राज्याला आर्थिक मदत केली, तर गृहमंत्री शहा हे भक्कमपणे पाठिशी राहिल्याने अनेक विकासकामे मार्गी लावली. पीएम आवास योजनेसह म्हाडा, सिडको अशा विविध माध्यमांतून घरे देण्यात येत आहेत. याबरोबरच राज्यात लवकरच नवे गृहनिर्माण धोरण आणण्यात येत आहे. त्यामुळे परवडणारी घरे निर्माण होतील,’ असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.‘पीएम आवास योजनेंतर्गत दुसऱ्या टप्प्यात देशभरात दोन कोटी घरे देण्यात येणार आहेत. त्यामध्ये जास्तीत जास्त घरे महाराष्ट्राला मिळण्यासाठी प्रयत्न करू,’ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *