कोकाटेंच्या राजीनाम्यासह आमदारकीबाबत निर्णय मुख्यमंत्री घेतील; गिरीश महाजन यांची माहिती.

 कोकाटे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासह आमदारकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री हे नियमानुसार योग्य तो सक्षमपणे निर्णय घेतील, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे.राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असली तरी त्याबाबतची तांत्रिक बाजू तपासणेही गरजेचे आहे. त्यामुळे कोकाटे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासह आमदारकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री हे नियमानुसार योग्य तो सक्षमपणे निर्णय घेतील, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदाविषयी निर्णय घेण्यास विलंब होत असला तरी येत्या एक ते दोन दिवसांत त्याबाबतही निर्णय होईल, असा दावाही महाजनांनी यावेळी केला.

‘प्रधानमंत्री आवास योजना टप्पा २’च्या लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण कार्यक्रमासाठी ते शनिवारी (दि. २२) नाशिक येथे आले होते. याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कृषिमंत्री कोकाटे यांच्यावरील कारवाईसंदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले की, संबंधित प्रकरण हे कायदेशीर बाब असल्याने त्याविषयी मला काही बोलता येणार नाही. मात्र, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे त्याबाबत योग्य तो नियमानुसार निर्णय घेतील. मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका घोटाळ्याबाबत तांत्रिक बाजू तपासल्या जातील, तसेच कायदेशीर बाबींचाही अभ्यास केला जाईल. त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे महाजन यांनी यावेळी स्पष्ट केले. नाशिक येथील प्रार्थनास्थळावरील कारवाईबाबत ते म्हणाले की, संबंधित जागा ही महापालिकेची आहे. त्यावर निर्माण झालेल्या प्रार्थनास्थळाविषयी तेथील नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या. त्यानुसार प्रार्थनास्थळाचे अतिक्रमण हटविण्यात आले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेनंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. या प्रकरणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शनिवारी आपली भूमिका स्पष्ट केली. या प्रकरणात संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पाळली जाईल. घटनेने दिलेल्या नियमानुसारच योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राहुल नार्वेकर यांनी दिली. राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकमधील कोर्टाने १९९५च्या एका प्रकरणात दोन वर्षांची कैद आणि ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. लोकप्रतिनिधीत्व कायद्यातील तरतुदीनुसार माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवर टांगती तलवार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आमदार सुनील केदार यांना शिक्षा ठोठावल्यानंतर चोवीस तासांच्या आत त्यांची आमदारकी रद्द झाली होती. पण, कोकाटे यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे याच न्यायाने माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. या पार्श्वभूमीवर नार्वेकर यांना आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, या प्रकरणी ण कायदेशीर प्रक्रिया पाळली जाणार आहे. सुनील केदार यांच्यासंदर्भात देखील कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले होते. आताही घटनेत दिलेल्या नियमानुसारच निर्णय घेतला जाईल असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.सिंहस्थाच्या तयारीसाठी असलेला कालावधी पाहता, त्याचे नियोजन करण्यासाठी दिवस खूप कमी राहिले आहेत. त्यामुळे पालकमंत्रिपदाचा निर्णयदेखील लवकर होणे गरजेचे असून, त्यास विलंब होत आहे. परंतु, येत्या एक ते दोन दिवसांतदेखील त्यावर योग्य तो निर्णय होईल, असे सांगत ‘देवाभाऊ’ अर्थात, देवेंद्र फडणवीसांची कृपा असेल तर पालकमंत्रिपद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुणे येथील कार्यक्रमापूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत देखील पालकमंत्रिपदाविषयी चर्चा झाली असावी, अशी शक्यताही त्यांनी बोलून दाखवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *