साडूची फारकत झाली आणि घरात घेतली साली ! शिवराम पाटील

साडूची फारकत झाली आणि घरात घेतली साली !

आमदार फोडणे, फुटणे ही प्रक्रिया चुकीची वाटते. जर भाजप ने आमदार फोडले नाहीत,असे खरे मानले तरीही अशा फुटीर लोकांना घेऊन सरकार बनवायला नको होते. हे फुटीर, गद्दार आमदार आपल्या आमदारांना बिघडवून टाकतील. अशी निती , भीती ठेवली पाहिजे. शिंदे आणि अजितदादा यांच्या फुटीर आमदारांना सरकार मधे न घेता लटकवत ठेवले असते तर यांचे पैकी काहींनी आत्महत्या केली असती. जरी हे फुटीर आमदार भाजप कडे आलेत तरीही फडणवीस हेच मुख्यमंत्री बनले असते. फुटीरांना मंत्री बनवले नसते तर शिंदे ठाण्यातील बार मधे दिसले असते आणि अजितदादा बारामतीच्या. जळगावचे गुलाबराव तर तळीराम बनले असते. फारकत झाली आणि दुसरा घरोबा मिळत नसेल तर त्या बाईला विचारा. काय मानसिकता बनते.”  दिल के आरमां आंसूओमे बह गये.”  भाजप पवित्र लोकांचा पक्ष आहे. असे ते म्हणतात. आम्ही ऐकतो. कारण , आमचेही डोकं तितकं काम करीत नाही. असे घर दार सोडलेल्या आमदारांना घरात घ्यायला नको होते. त्यांनी देवदास बनून पारू पारू नव्हे दारू दारू म्हणत जीव सोडला असता. असे केले असते तर महाराष्ट्रातील प्रत्येक घरात फडणवीस आणि मोदी यांचा फोटो लटकला असता.आता तर प्रत्येक शेंबड्या शिवी देतो. साडूची फारकत आणि साली घेतली घरात.


भाजप चे लोक राम राम करतात. पण रामायण वाचत नाहीत. रामासारखे वागत नाहीत. भाजप आणि राम यांत जमीन अस्मान चे अंतर आहे.
रावणाने सीतेचे अपहरण केले. लंकेत नेऊन ठेवले.कोणालाही काहीच अतापता माहिती नाही. राम सीतेला शोधत शोधत खूप हैराण झाले. एकदा पार्वती सीतेचे रूप घेऊन रामा समोर उभी राहिली.म्हणाली ,  हे प्रभू!  तुम्ही सीतेला शोधत आहात.ती सीता मी आहे. तेंव्हा राम म्हणाले, नाही! तू सीता नाही माते. तू परस्त्री आहेस. मला विचलित करू नकोस. हे रामाचे खरे चरित्र आहे.भाजप चे लोक हे चरित्र जाणत नाहीत,मानत नाहीत. फक्त दगडाचा राम बनवतात. दगडाचा राम बनवणे सोपे आहे. पण मनाचा राम बनवणे कठीण आहे. भाजपचे लोकांना ते शक्य झाले नाही.होणार नाही.ते सत्तापिपासू आहेत.ते धनलोभी आहेत.मदिरा आणि मदिरीक्षी बाबत सांगणे सुद्धा पाप आहे.या आमच्या जळगाव आणि जामनेर ला. ते पण कळेल. तात्पर्य, अटलबिहारी वाजपेयी यांनी एका खासदार वाचून केंद्र सरकार सोडले, त्यागले.  आणि हे आत्ताचे भाजपचे लोक शिंदे व अजितदादाची गळाभेट घेत आहेत.  दुर्जनस्य कुतो लज्जा?

… शिवराम पाटील महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *