कळवणमध्येही बांगलादेशी? ‘पीएम किसान योजने’च्या चौकशीची किरीट सोमय्यांची मागणी.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची मुंबई येथे भेट घेऊन तालुक्यातील पीएम किसान योजनेत कसा घोटाळा सुरू आहे, हे निदर्शनास आणून दिले होते.तालुक्यातील भादवाण येथे पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे १८१ मुस्लिम बोगस लाभार्थी ग्रामस्थांना आढळून आले आहेत. तालुक्यात असे आणखी किती बोगस लाभार्थी लाभ घेत आहेत. याचा शोध घेऊन तत्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कृषी, महसूल व पोलिस प्रशासनाला केली आहे.भादवण गावात एकही मुस्लिम कुटुंब नसताना येथे पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे १८१ लाभार्थी लाभ घेत होते. ग्रामस्थांनी ही बाब कळवण तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार व सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन निदर्शनास आणून दिली.

मात्र, या बाबत काहीही कारवाई होत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची मुंबई येथे भेट घेऊन तालुक्यातील पीएम किसान योजनेत कसा घोटाळा सुरू आहे, हे निदर्शनास आणून दिले होते. या प्रकारची चौकशी होऊन महाराष्ट्रासह देशात किती बोगस लाभार्थी आहेत. याची चौकशी सुरू व्हावी यासाठी आज थेट प्रशासकीय कार्यालयातील कृषी विभागात उपविभागीय कृषी अधिकारी अशोक डमाळे, तालुका कृषी अधिकारी मीनल म्हस्के, तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्याशी चर्चा करून त्यांनी माहिती घेतली.पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

तसेच नंतर सोमय्या यांनी कळवण पोलिस ठाणे गाठून उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांना या प्रकरणाची तत्काळ चौकशी करण्याची व खोट्या लाभार्थ्यांची नोंद करणाऱ्या यंत्रणा व लाभार्थ्यांची बँक खात्याद्वारे माहिती घेऊन त्यांना अटक करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली.यावेळी भादवणचे ग्रामस्थ अतुल जाधव, पंकज जाधव, काशिनाथ गुंजाळ, गौतम जाधव, योगेश जाधव, केदा जाधव, किशोर देशपांडेंसह भाजपाचे नंदकुमार खैरनार, भाजप तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, शहराध्यक्ष निंबा पगार आदी उपस्थित होते.ग्रामस्थांच्या जागृतपणामुळे हा घोटाळा उघडकीस आला आहे. मालेगाव येथे बोगस कागदपत्रे सादर करून जन्मदाखल्यांचा घोटाळा उघडकीस आला आहे. त्याचप्रमाणे या घोटाळ्यातील काही बैंक खात्यांची चौकशी केली असता हे लोक व त्यांची नावे बांगलादेश सीमेवरील असल्याचे आढळून आले आहे. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी केंद्राची मदत घेऊ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *