शिमग्याआधीच प्रवाशांच्या बोंबा! होळीनिमित्त खासगी बसचे भाडे कडाडले, मुंबई ते कोकण तिकीट किती.

शिमगोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांवर होळीच्या आधीच बोंबा मारण्याची वेळ आली आहे. शिमगोत्सवानिमित्त कोकणात प्रवासी मागणी वाढल्याने खासगी बसचे भाडेदर कडाडले आहेत.कोकण रेल्वेमार्गावर नियमित गाड्यांचे पूर्ण झालेले आरक्षण, मोजक्या विशेष फेऱ्या आणि एसटीच्या अपुऱ्या बसगाड्या यामुळे शिमगोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांवर होळीच्या आधीच बोंबा मारण्याची वेळ आली आहे. शिमगोत्सवानिमित्त कोकणात प्रवासी मागणी वाढल्याने खासगी बसचे भाडेदर कडाडले आहेत.मुंबई ते रत्नागिरीदरम्यान ४०० ते ६०० रुपये असलेला खासगी बसचा दर सध्या ६०० ते ८०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

वातानुकूलित आसनी आणि शयनयान श्रेणीतील बसगाड्यांचे भाडेदर १,५०० रुपयांपासून आहेत. शिमगोत्सवाला अद्याप आठवडा बाकी आहे. तत्पूर्वीच वातानुकूलित बसगाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले असल्याचे ट्रॅव्हल्सचे बुकिंग करणाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे, अशी प्रतिक्रिया प्रवासी संदीप वारंग यांनी दिली.एसटी गाड्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. यामुळे अधिकचे भाडे भरून खासगी बसनेच प्रवास करावा लागत आहे. पाच जणांच्या कुटुंबीयांना जाण्या-येण्याचा खर्च सात ते आठ हजार रुपये होतो, असे नियमित प्रवासी दिनेश सावंत यांनी सांगितले.

खासगी बसला सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत केली जात नाही. एसटी गाड्यांच्या तुलनेत खासगी वातानुकूलित आसनी आणि शयनयान श्रेणीतील बसगाड्यांची स्थिती चांगली असते. सणासुदीच्या हंगामातच आणि एसटी भाडेदराच्या दीडपटीपर्यंतच खासगी बस चालक-मालकांकडून वाढीव दर आकारण्यात येतात, असा दावा खासगी बसचालकांनी केला आहे. दरम्यान, ऑनलाइन बस आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीटदरात १० ते १५ टक्के सवलत मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *