जालना येथे मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यकर्त्याने एका व्यक्तीला लोखंडी गजाने चटके दिल्याने ओबीसी समाज आक्रमक झाला. छगन भुजबळांनी हे प्रकरण विधानसभेत मांडले होते. आता नुकताच यावर बोलताना जरांगे पाटील हे दिसले.जालन्यात एका व्यक्तीला मनोज जरांगे पाटील यांच्या अत्यंत जवळच्या कार्यकर्त्याने लोखंडी गज गरम करून असंख्य चटके दिली. ज्यानंतर ओबीसी समाज आक्रमक होताना दिसला. हेच नाही तर छगन भुजबळांनी हे प्रकरण विधानसभेत मांडले. व्हिडीओमध्ये या व्यक्तीला किती क्रूरपणे चटके दिली जात होती, हे स्पष्ट दिसत होते. यावरून आमदार छगन भुजबळ यांनी जरांगे यांच्यावर टीका केली होती. अगोदर जरांगे हे म्हणाले होते की, तो व्यक्ती मंदिरासमोर चुकीचे चाळे करत असल्याने त्याला चटके देण्यात आली.
मनोज जरांगे यांचे बोलणे ऐकल्यानंतर त्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी हा दावा चुकीचा असल्याचे म्हटले. यावर आता बोलताना जरांगे हे दिसले आहेत. जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका देखील केली. जरांगे म्हणाले की, त्यांना काय जातीयवादाची सवय लागलीये. त्यांच्यावर काही केले की, लगेचच दुसऱ्यांवर काहीतरी करायचे. जातीयवाद हा अंगात विषारीपणा असतो. त्यांचा माणूस वाचवण्यासाठी दुसऱ्यांवर आरोप करतो.धस आण्णा यांनी समर्थन केले का?. यांनी मोर्चे काढले, हे विषारी लोक आहेत. त्यामध्ये कोण आहे कोण नाही ते तपास यंत्रणा बघेल. आपण समर्थनच करत नाहीत त्या गोष्टीचे. आम्ही काय छगन भुजबळांच्या विचाराचे आहोत का? समर्थन करायला.